ETV Bharat / state

Whatsapp Frauds: रहा सावधान! आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील होऊ शकते फसवणूक, अशी घ्यावी दक्षता

author img

By

Published : May 11, 2023, 10:07 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात जवळपास ५० कोटी वापरकर्ते आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्समुळे हैराण झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक स्पॅम कॉल येत आहेत. यासोबतच फेक मेसेजही येत आहेत. तरी सायबर गुन्हे कक्ष, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अश्या मेसेज कॉल पासून सावधानता बाळगावी जेणे करून फसवणूक होणार नाही.

Whatsapp Frauds
व्हाट्सएप फसवणूक

मुंबई: भारतातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉलमुळे हैराण झाले आहेत. आजच्या दैनंदिन जिवनामध्ये नागरिक एकमेकांसोबत संवाद साधण्याकरीता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठया प्रमाणावर करीत आहेत. हिच गोष्ट लक्षात घेवून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करुन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नागरिकांच्या फसवणूक करण्याकरीता करीत आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने व सध्या सुरु असणारा प्रकार +84, +62, +60, +92 अशा नंबरने सुरवात असलेल्या आंतराष्ट्रीय नंबरवरून (मलेशिया, केन्या, व्हिएतनाम, इथिओपिया) कॉल करून फसवणूक करीत आहेत.



अशी होते फसवणूक: फसवणूक प्रकारांमध्ये कॉल उचलल्यास काही ना काही कारण करून लिंक, फोटो, व्हिडीओ क्लिक करून रेटींग अथवा काही पैसे मिळतील असे आमिष दाखविले जाते. परंतू अशा लिंक, फोटोझ, व्हिडीओच्या मागे माल्वेअर (व्हायरस) असल्यास आपल्या मोबाईलमधील डेटा शेअर होवून आपली फसवणूक होवू शकते. तरी सायबर गुन्हे कक्ष, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, अश्या मेसेज कॉल पासून सावधानता बाळगावी जेणे करून फसवणूक होणार नाही.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी :

१. अ ८४, अ ६२, अ ६०, अ ९२ अशा क्रमांकाने सुरुवात असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे कॉल / व्हिडीओ कॉल रिसीव्ह करू नये अथवा चॅटींग करू नये.

२. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर Two Step Veification सेटींग Enable करून ठेवा.

३. अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप वरून आलेल्या लिंक, फोटोझ, व्हिडीओजवर क्लिक करू नका.

४. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचा सिक्युरीटी कोडची मागणी केल्यास तो कोणासही देवू नका.

५. बँकेच्या कार्ड तपशील, पिन, ओटीपी पासवर्ड इत्यादी वैयक्तीक किंवा आर्थिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.

६. कोणतीही बँक, सिम मोबाईल कंपनी, गॅस वितरण एजन्सी, इलेक्ट्रीसिटी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्राहकांची माहिती मागत नाहीत.



फसवणूकीबाबत सतर्क रहावे: मिरा-भाईंदर, वसई-विरार शहरातील नागरिकांना सायबर गुन्हे कक्ष, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात येत की, अशा प्रकारे होणाऱ्या फसवणूकीबाबत सतर्क रहावे. तसेच अशा प्रकारे कोणत्याही इसमाची फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

हेही वाचा -

  1. रहा सावधान आता व्हॉट्सअ‌ॅपवर देखील होऊ शकते फसवणूक
  2. फसवणुकीचा एक असाही फंडा व्हॉट्सअॅपवरून मैत्रिणीलाच घातला ३ लाखांचा गंडा
  3. सायबर फ्रॉडद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला एक कोटी रुपयांचा गंडा सीईओ अदर पुनावाला यांच्या व्हॉट्सऍप नंबरवरून बनावट मेसेज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.