ETV Bharat / state

Mumbai International Airport : कोरोना विषाणूबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुठलाही प्रोटोकॉल नाही; विमानतळ प्रवक्त्यांची माहिती

author img

By

Published : Dec 22, 2022, 10:47 PM IST

कोविड बी एफ 7 विषाणूला विमानतळावर प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही प्रोटोकॉलची सुरुवात ( No Protocol at Mumbai International Airport ) नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार विमानतळावर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रवासी चाचणी बंधनकारक आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते ( Mumbai Airport Regarding Corona Virus ) यांनीदेखील विमानतळावर सर्व प्रवाशांच्या ( Airport Spokesperson Information ) चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर CSMIA अद्याप कोणत्याही ( Mumbai International Airport Regarding Corona ) कोविड चाचण्या सुरू नाही. विमानतळावर रोज येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे म्हणणे कोणतेही कोविड प्रोटोकॉल सुरू नाही. खुद्द विमानतळ प्राधिकरण प्रवक्त्यांनी केला खुलासा अद्याप कोविड प्रोटोकॉल सुरू नाही.

Mumbai International Airport
कोरोना विषाणूबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुठलाही प्रोटोकॉल नाही; विमानतळ प्रवक्त्यांची माहिती

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट, अवतार बीएफ 7 नवीन व्हेरियंटमुळे पुनः तिसरी लाट येते की ( No Protocol For Covid 19 Virus at Mumbai Airport ) काय, अशी शंकेची पाल चुकचकते आहे. कारण जनतेच्या मनात मागील ( No Protocol at Mumbai International Airport ) अनुभव आहे. आता ब्राझील, द. कोरिया, जापान आणि सर्वात चर्चेचा विषय ठरला ( Mumbai Airport Regarding Corona Virus ) चीन देश होय. या देशांत कोविड-१९ चे संक्रमित रुग्णसंख्या ( Airport Spokesperson Information ) वाढत आहे. त्यामुळे भारतातही चिंता ( Mumbai International Airport Regarding Corona ) वाढली आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत महाराष्ट्र शासनही सतर्क झाले आहे.

कोरोना विषाणूबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुठलाही प्रोटोकॉल नाही; विमानतळ प्रवक्त्यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोविड-19 ची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, कोविड संसर्ग पसरण्याची शक्यता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ही आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणतेही कोविड प्रोटोकॉल किंवा चाचण्या सुरू झाल्या नाहीत. त्याठिकाणी जाऊन ईटीव्ही प्रतिनिधी श्याम सोनार यांनी वस्तुस्थिती मांडली आहे जाणून घेऊया यावरील सविस्तर रिपोर्ट.


कोरोना महामारीच्या कारणामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ठरलेय महत्त्वाचे कारण : कोरोना महामारीची सुरुवात होण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महत्त्वाचे मूलभूत कारण ठरले होते. बीएफ 7 हा होंगकाँगमधून चीनमध्ये पसरला. त्यामुळे चीनमध्ये हाहाकार उडाला. या घटनेमुळे मागील अनुभवातून केंद्र शासन आणि विमानतळ प्राधिकरण यांनी काही धडा घेऊन खबरदारी घेतली आहे काय हे पाहणे आवश्यक होते. कोविड १९ संक्रमित रुग्ण किंवा सदृश्य रुग्ण यांची ओळख त्वरित होणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानतळावर ईटीव्ही प्रतिनिधी श्याम सोनार यांनी भेट दिली असता, कोणत्याही रॅपिड अँटिजेन टेस्ट, थर्मल टेस्टशिवाय कडक कोविड-१९ मार्गदर्शक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसले.


महाराष्ट्र सरकार लवकरच एक टास्क फोर्स स्थापन करणार : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्याची कोविड-19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचे निर्बंध येणार का, पुन्हा मास्क घालणे आवश्यक आहे का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक टास्क फोर्स स्थापन करणार आहे. यावर राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्यांच्या यंत्रणांशी समन्वय साधेल, असे त्यांनी सांगितले. किंबहुना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते. महाराष्ट्र राज्यात 21 डिसेंबरपर्यंत 135 कोविड रुग्ण : अलिकडच्या आठवड्यात, चीनच्या शहरांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जरी 2020 आणि 2021 मध्ये महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी आहे.

मुंबईतील स्थिती : देशातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती अद्याप चिंताजनक नाही. दैनंदिन प्रकरणे खूप आहेत. मुंबईत कमीत कमी 1 ते 21 डिसेंबरदरम्यान, शहरात कोविड-19 ची 135 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर एप्रिल 2021 मध्ये 24 तासांच्या कालावधीत शहरात 11,000 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले.त्यामुळेच मुंबईत विमानतळावर कोविड १९ प्रतिबंध करिता प्रोटोकॉल पालन जरूरी आहे.

विमानतळ प्राधिकरणाचा खुलासा : या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रवक्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की," केंद्र शासनाने काल केवळ राज्यांना सावधानता बाळगा असे पत्र घडवलेले आहेत .मात्र विमानतळावर कोणत्याही प्रोटोकॉल सुरू केले नाहीत. कोणत्याही चाचण्या सुरू केलेल्या नाहीत. ज्यावेळी वरिष्ठांकडून सुचना येतील तेव्हा त्या आपल्याला कळवले जाईल."

केंद्र शासनाच्या सूचना आदेश काय : केंद्र शासनाच्या 21 डिसेंम्बर कोविड प्रतिबंध नियमांचे पालन केले गेले पाहिजे. मास्क लावणे सक्तीचे वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे. त्यासोबतच आधीच आजार असलेल्या व्यक्तींची स्वतंत्र नोंद .विविध प्रकारच्या विविध संदर्भातील चाचण्या विमानतळावर करणे. कोविड सदृश्य रुग्ण आढळल्यास त्याची स्वतंत्र नोंद करणे .त्याचे विलगीकरण करणे. त्यासाठीच्या सर्व सुविधा आणि वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध असणे. जर कोविड चाचणीमध्ये एखाद्या व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला तर त्याला ताबडतोब संबंधित केंद्रामध्ये वेगळे करणे. मात्र या सूचनांचा विसर विमानतळ प्राधिकरणाला पडलेला दिसत आहे. विमानतळावर रोज ये आणि जा करणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालक यांना देखील ईटीवी द्वारे माहिती विचारली असता त्यांनीदेखील तुजोरा दिला की," covid-19 बाबतचे कोणतेही प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सुरू केलेले नाही."

महाराष्ट्रात एक कोटी 65 लाखा 20 हजारपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण : यासंदर्भात डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी म्हटले," चीनमध्ये कोरोनाचा जो नवीन प्रजाती आलेली आहे बी एफ सेवन यामुळे चीनमध्ये हा हक्क कार उडालेला आहे तिथली रुग्णालय तुडुंब भरलेली आहे त्यामुळेच सावधानता बाळगण्याशिवाय पर्याय नाही .आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे कोविड अधिक फैलावला .त्यामुळे महाराष्ट्र शासन प्रशासन आणि जनता यांना खबरदारी घ्यावी. विशेष करून आंतरराष्ट्रीय प्रवास हे विमानाने येतात त्या ठिकाणी कडक पद्धतीने चाचण्या केल्या गेल्या पाहिजे. आधीचा पूर्व अनुभव आपल्या गाठीशी आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका मात्र कोविड प्रोटोकॉल आपण पाळला तर आपल्या हिताचे आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.