ETV Bharat / state

Nitesh Rane On INDA : भारताचे विभाजन करण्‍याचा विरोधकांचा कट - नितेश राणे

author img

By

Published : Jul 19, 2023, 5:04 PM IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आजचा तिसरा दिवस आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक अधिवेशनात संतापाचा पाऊस पाडत आहेत. तर दुसरीकडे नितेश राणे यांनी विरोधकांच्या बेंगळुरूमधील बैठकीवरु टीकास्त्र सोडले आहे. तुकडे तुकडे गॅंगचा भारताचे विभाजन करण्‍याचा कट आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Nitesh Rane On INDA
Nitesh Rane On INDA

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. हवमान खात्याने येत्या चार दिवसात कोकणसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. तसेच सरकारच्यावतीने चोवीस तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीत नुकसान झाल्यास सरकार मदत करण्याचा विचार करेल, तसेच नुकसाग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोधकांच्या बेंगळुरूमधील बैठकीवरु टीकास्त्र सोडले आहे. तुकडे तुकडे गॅंगचा भारताचे विभाजन करण्‍याचा कट आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

तुकडे तुकडे गँगचे सदस्य : नेहमीप्रमाणे आज सकाळी संजय राऊत यांनी भांडुपमध्ये बसून इंडिया कशी जिंकणार असे प्रवचन दिले. काल बेंगळुरूमध्ये गेलेले सर्वजण तुकडे तुकडे गँगचे सदस्य होते, अशी टीका नितेश राणे यांनी विरोधकांवर केली आहे. हिंदुत्वाचा नारा देणारे उद्धव ठाकरे बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

एनडीएशिवाय पर्याय नाही : तुकडा तुकडा गॅंगचा भारताचे विभाजन करण्‍याचा कट आहे. हिंदू समाजाविरोधात कारस्थान रचले जात आहे? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल एनडीएची बैठक झाली. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संकल्प केला आहे. 2024 मध्ये भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर एनडीएशिवाय पर्याय नाही असे पंतप्रधान म्हणाल्याचे राणे म्हणाले.

शेतकरी विरोधी सरकार : राज्यातील सरकार शेतकऱ्यांविरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आज विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासातही दिसून आले. खते, बियाणे महाग नाहीत, असे राज्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचे दिसून येते. या सरकारचा आम्ही निषेध करतो असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

70 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त : महाराष्ट्रात आज 70 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक भरतीसाठी 20 हजार निवृत्त शिक्षकांना घेऊ असे सरकाचे नियोजन आहे. त्यामुळे राज्यभरातील युवकांकडून या घटनेचा निषेध होत आहे. आज गरीब आणि सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. नागरिकांना निरक्षर ठेवण्याचे काम सरकार करत आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे असे पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On INDIA : आम्ही जमतो म्हटल्यावर मोदींना ९ वर्षानंतर एनडीएची आठवण-संजय राऊत यांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.