ETV Bharat / state

Nitesh Rane on PFI : पीएफआयला समर्थन देणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा : नितेश राणे

author img

By

Published : Sep 24, 2022, 2:12 PM IST

Updated : Sep 24, 2022, 2:27 PM IST

Nitesh Rane Demand
नीतेश राणेंची मागणी

दहशतवादी आणि त्यांच्या देशविघातक कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि एटीएसने महाराष्ट्रसह देशातील वेगवेगळ्या ( NIA ED and ATS have Arrested 106 Activists ) भागांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १०६ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या प्रकरणी पुण्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत, नारेबाजी केली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ( Strict Action Against People Who Supporting PFI ) पोलिसांकडे केली आहे.

मुंबई : दहशतवादी आणि त्यांच्या देशविघातक कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि एटीएसने महाराष्ट्रसह देशातील वेगवेगळ्या ( NIA ED and ATS have Arrested 106 Activists ) भागांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १०६ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या प्रकरणी पुण्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत, नारेबाजी केली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ( Strict Action Against People Who Supporting PFI ) पोलिसांकडे केली आहे.

नीतेश राणेंची मागणी

काय म्हणालेत नितेश राणे : नितेश राणे म्हणाले आहेत की, पुण्यात पीएफआयच्या समर्थनार्थ काही नालायक लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. परंतु हे लोक विसरले आहेत की आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. देशाच्या विरोधात नारे देणाऱ्या या देशद्रोह्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करावी व यांना तत्काळ अटक करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचे प्रकार परत होणार नाहीत, याकडेही पोलिसांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत झाल्या गुप्त बैठका : कोचीहून अजित डोवाल यांनी मुंबईत जाऊन याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची गव्हर्नर हाऊसमध्ये बैठक घेतली. या भेटींची गुप्तता डोवाल यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. एनएसएच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, या बैठकीदरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यापूर्वी किंवा उरी सर्जिकल स्ट्राइकपूर्वी जी गुप्तता पाळण्यात आली होती तीच गुप्तता पाळण्यात आली होती. तीन-चार महिन्यांपूर्वी इस्लामिक नेत्यांशी सल्लामसलत करून ही योजना तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून एनएसए डोवाल यांनी संपूर्ण योजना गुप्त ठेवली.

या मोहिमेत दहा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी केले एकत्रित काम : 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच ज्या दिवशी NIA ने PFI च्या कार्यालयावर आणि देशातील 10 राज्यांमध्ये एकाच वेळी त्यांच्या कामगारांच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) 200 हून अधिक अधिकारी, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी तसेच किमान दहा राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी एकत्र काम केले. 15 हून अधिक राज्यांमध्ये 150 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि 106 PFI नेते आणि सदस्यांना अटक करण्यात आली.

Last Updated :Sep 24, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.