ETV Bharat / state

Bhima Koregaon case! फरार दोन आरोपीं विरोधात एनआयए कोर्टाकडून अजमीनपात्र वॉरंट

author img

By

Published : Dec 15, 2022, 10:52 PM IST

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. (Bhima Koregaon case) राष्ट्रीय तपास संस्थाने या आरोपीं विरोधात अजमीन पात्र वॉरंट जारी करण्यासंदर्भात 7 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. हा अर्ज आजवर न्यायाधीश राजेश कटारिया यांनी अजामीन पात्र वॉरंट जारी केला आहे.

Bhima Koregaon case
सत्र न्यायालय

मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील फरार आरोपी प्रकाश उर्फ ​​रितुपन गोस्वामी, गणपथी उर्फ ​​मुपल्ला लक्ष्मणराव या दोन फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्था कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथक नेमण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, एनआयएने 7 डिसेंबर रोजी वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी आपल्या याचिकेच्या समर्थनार्थ तपास अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. या अर्जावर न्यायालयाने एनआयएच्या सरकारी वकिलांचे युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवार (दि. 15 डिसेंबर)रोजी या संदर्भातील निकाल देत या दोन्ही विरोधात अजामीन पात्र वारण जारी करण्यात आले आहे.



इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध - एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये कायद्याअंतर्गत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणातील सात आरोपींना (2018)पासून तर सहा जण (2020)पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध करून दिल्या जात नाही, तोपर्यंत न्यायालय खटला पुढे करू शकत नाही.

नेमके प्रकरण काय आहे? - मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या (200)व्या स्मृतिदिनानिमित्त (31 डिसेंबर 2017)रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे (1 जानेवारी 2018)रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. (31 डिसेंबर 2017)रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होते अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

वरनॉन गोन्सालविस यांना अटक - या एल्गार परिषदेच्या मागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत. या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. (28 ऑगस्ट)रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.