ETV Bharat / state

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बबनदादा शिंदेसह पंकज भुजबळांना पुन्हा संधी

author img

By

Published : Oct 3, 2019, 12:24 PM IST

Updated : Oct 3, 2019, 1:53 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये २० उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये २० उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये माढा मतदारसंघातून बबनदादा शिंदे, माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना तर अहेरीतून धर्मराव बाबा अत्राम, नांदगावमधून पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे.

बुधुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ७७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आज पुन्हा २० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर


राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली असून, यामध्ये विद्यमान ५ आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यासोबतच तब्बल १३ नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत. मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आष्टी विधानसभा मतदारसंघातून आमदार बनलेले सुरेश धस हे भाजपमध्ये गेले असल्याने त्याठिकाणी राष्ट्रवादीने बाळासाहेब आजळे यांना उमेदवारी दिली आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचारासंदर्भातील आरोपी असलेले मोहोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम यांच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने यशवंत माने यांना उमेदवारी दिली आहे. माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे नुकतेच निधन झाले असल्याने त्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादीने उत्तमराव जानकर हा नवीन चेहरा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उतरवला आहे. काही हजार मतांच्या फरकाने मागील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या खेड-आळंदी येथील दिलीप मोहिते आणि अहेरी येथील माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरवले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी जळगाव,बाळापुर, कारंजा, मेळघाट, दिग्रस,कन्नड, देवळाली, मावळ, पिंपरी, आष्टी, मोहोळ, माळशिरस आणि चंदगड याठिकाणी नवीन चेहरे दिले आहेत. चंदगड येथे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्या कुपेकर देसाई ह्या होत्या. मात्र, त्यांनी यावेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याची इच्छा व्यक्त करणारे कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनाही काँग्रेसने मैदानात उतरवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पाच विद्यमान आमदारांना पुन्हा मैदानात उतरवले आहे त्यात गंगाखेड मधून डॉ. मधुसूदन केंद्रे, नांदगाव येथून पंकज भुजबळ, बागलान येथून दीपिका चव्हाण, कर्जत येथून सुरेश लाड आणि माढा येथून बबनदादा शिंदे यांचा समावेश आहे.

ही बातमी पाठवली असून याचे 1too1 मिळाले नव्हते म्हणून पाठवीत आहे.... अपडेट करावे pls
Last Updated : Oct 3, 2019, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.