ETV Bharat / state

Ajit Pawar NCP Meeting : वसंतदादा यांना असेच वाईट वाटले असेल...-छगन भुजबळ यांची शरद पवारांवर टीका

author img

By

Published : Jul 5, 2023, 2:03 PM IST

Updated : Jul 5, 2023, 7:07 PM IST

अजित पवार यांच्या वांद्रे येथील बैठकीत छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली आहे. पहिल्यांदाच भाषणात त्यांनी शरद पवारांवरदेखील टीका केली आहे.

AJit Pawars NCP Meeting
छगन भुजबळ यांची शरद पवारांवर टीका

मुंबई: राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा भाषण केले. या भाषणात त्यांनी पक्षांमधील काही बाबींवर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे शरद पवारांवरही त्यांनी तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षातील फुटीचे कारण स्पष्ट करताना आमच्या विठ्ठलाला वाईट माणसांनी घेरल्याचा आरोप केला. हा आरोप करताना त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये झालेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार गटाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

डोळ्यात अश्रू येणे स्वाभाविक : छगन भुजबळ म्हणाले, की गुगलीने आपल्याच गड्याला आउट करायचे का? जसे शिवसेनेबरोबर गेलो, तसे भाजपबरोबर गेले आहोत. पक्षात सगळ्याच समाजाकडे लक्ष दिलेले नाहीत. भाजपमध्ये आम्ही प्रवेश केलेला नाही. आम्ही हरणार नाही लढणार आहोत. तुरुंगात गेलो, पण लढा सोडला नाही. साहेबांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणे स्वाभाविक आहे. विठ्ठलाला बडव्यांना घेरले आहे, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वाईट वागणूक मिळाली आहे. नागालँडमध्ये आमदार हे भाजपमध्ये गेले. त्यांच्याप्रमाणे आमचा सत्कार नाही का? वसंतदादा यांना असेच वाईट वाटले, अशी आठवण भुजबळ यांनी करून दिली आहे.

बिनकामांच्या बडव्यांची गर्दी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करणाऱ्या छगन भुजबळ यांनी अचानक आमच्या विठ्ठलाला वाईट लोकांनी घेरल्याचा आरोप केला. शरद पवारांच्या ताफ्यात बिनकामी बडव्यांची गर्दी आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा राजकीय पक्षांमध्ये फूट पडते, तेव्हा बंडखोर गटाकडून असे आरोप होत असतात. राज्याने या आगोदर अनेक नेत्यांची बंड पाहिली आहे. त्यात नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, आत्ता अजित पवार या नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे, राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यार गंभीर आरोप करण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख आमचे दैवत असल्याचे बंडखोर नेते सांगतात. तसाच आज प्रकार बघायला मिळाला आहे. शरद पवारांच्या बाजुला अनेक बिनकामाच्या बडव्यांनी गर्दी केल्याचा आरोप भूजबळ यांनी केला आहे.

शिवसेनेविरोधात बंड : अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप-शिंदे गटासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. वर्षभरापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. असेच काहीसे आता राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांबाबत पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा अजित पवारांचे बंड पहायला मिळाले. शरद पवारांची बाजू सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या छगन भुजबळांनी आमच्या विठ्ठलाला बडव्यालाही घेरले आहे, असा आरोप केला आहे. शरद पवारांभोवती बडवे नेमके कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भूजबळांचा इशारा जयंत पाटील, जितेंद्र अव्हाडांकडे तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : अजित पवार यांचा राष्ट्रवादीवर दावा, निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल

Last Updated : Jul 5, 2023, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.