ETV Bharat / state

NCP hearing in EC : राष्ट्रवादी काकाची की पुतण्याची? निवडणूक आयोगात आज होणार सुनावणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 11:48 AM IST

NCP hearing in EC : शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे प्रकरणही आता निवडणूक आयोगीत पोहोचले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग निकाल देणार की सुनावणी पुढं ढकलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

NCP hearing in EC
NCP hearing in EC

नवी दिल्ली NCP hearing in EC : शिवसेना कुणाची यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना आता राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगात होणार आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीतून वेगळा गट स्थापन करत 2 जुलैला भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलंय. या लढाईसाठी 6 ऑक्टोबर ही पहिली तारीख देण्यात आली होती.

सुनावणीकडं सर्वांच लक्ष : राष्ट्रवादीत फूट आहे की नाही? याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. शरद पवार गटाकडून वारंवार दावा करण्यात येतोय की, पक्षात फूट नाही. राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे. पक्षाची घटना, आमदार खासदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या या गोष्टी तपासत निवडणूक आयोगानं निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणांत अनेकदा निवडणूक आयोग अंतिम निर्णयाआधी तात्पुरता निर्णय म्हणून चिन्ह गोठवतं असतं. त्यामुळं आता राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाबाबत काय होतं, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे.

दोन्ही गटाकडून जोरदार तयारी : शिवसेनेसारखचं राष्ट्रवादीच्या प्रकरणातही शपथपत्रं, कागदपत्रांची लढाई जोरदार सुरू आहे. शरद पवार गटाकडून 8 ते 9 हजार कागदपत्रं सादर झाल्याचं सांगितलं जातंय. अजित पवार गटापेक्षाही कागदपत्रं जास्त असल्याचा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात येतोय. यामुळं आजच्या सुनावणीत काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजपर्यंत काय घडलं :

  • अजित पवार गटानं 2 जुलै रोजी सरकारमध्ये सामिल होत शपथ घेतली
  • निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी शरद पवार गटाकडून कॅव्हिएट दाखल करण्यात आली.
  • 30 जून रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा अजित पवार गटानं केला, तसंच 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा त्यांनी केला.
  • यानंतर दोन्ही बाजूंना नोटीसा देत निवडणूक आयोगानं त्यावर 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडायला सांगितलं.

हेही वाचा :

  1. Jayant Patil On NCP MLA: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील
  2. Ajit Pawar Group Opinion : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी अजित पवार गटाला हवी मुदतवाढ
  3. Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा? कायदेतज्ज्ञ असिम सरोदे म्हणतात.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.