ETV Bharat / state

Dandia Fake Pass Case : बनावट गरबा पासच्या विक्री प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:20 PM IST

Dandia Fake Pass Case : नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं (Navratri 2023) मुंबईत बोरीवलीत आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात बनावट पासची विक्री केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Fake Passes
गरब्याच्या कार्यक्रमात बनावट पास

मुंबई Dandia Fake Pass Case : सध्या नवरात्रीच्या उत्सवात (Navratri 2023) दांडियाची (Dandiya) मौज मजा मुंबईत लूटली जात आहे. बोरिवलीत दांडियाच्या प्रवेशिका बोगस बनवून विक्री केल्याचा प्रकार एमएचबी कॉलनी पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर, आता मुलुंड पोलिसांनी देखील 'प्रेरणा रास नवरात्री' याचे 225 बोगस दांडिया पासेस जप्त केले आहेत. याप्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या विशाल गारगोटे वय 32 यांनी दिलेल्या तक्रारीवरून, मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) भारतीय दंड संविधान कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस दांडियाचे पासेसची विक्री : अज्ञात आरोपीने 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान बोगस दांडियाचे पासेसची विक्री केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृह मंदिराच्या मैदानावर हा दांडिया आयोजित करण्यात आला आहे. या दांडियाचा इव्हेंट मॅनेजमेंट पाण्यासाठी विशाल गारगोटे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र अचानक 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबरला प्रेरणा रास गरबा सुरू असताना, अचानक लोकांची गर्दी का वाढली. 19 ऑक्टोबरला कालिदास मैदानावरील मुख्य प्रवेशद्वारावर सर्वांचे पास व्यवस्थित तपासण्याचे ठरले.

दांडियाच्या या सीजन पास 65 ची किंमत 1800 रुपये असून अज्ञात आरोपींनी एकूण चार लाख पाच हजार रुपयांचे 225 सिझन पासेस विक्री केली आहे. या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आले नाही. प्रेरणा रास गरबा 2023 च्या डेली पासेसची किंमत 300 रुपये आहे, तर सीजन पासेस किंमत 1800 रुपये आहे. - कांतीलाल कोथबीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक



असा प्रकार आला समोर : त्यानंतर 19 ऑक्टोबरला कालिदास नाट्यगृह मैदानावर ठरल्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावरील स्टाफने प्रत्येक सीजन पाच आणि डेली पास स्कॅन करून लोकांना आत सोडत असताना, बरेच सीजन पासेसचे बारकोड नंबर PR2023-00001 आणि PR2023-00700 असे असल्याचे दिसून आले. ते सीजन पासेस बनावट असल्याचे स्टाफच्या लक्षात आले. त्यानंतर स्टाफने याबाबतची माहिती ताबडतोब इव्हेंट मॅनेजमेंट पाहणारे गारगोटे यांच्या निदर्शनास आणून दिले. 19 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान सर्व लोकांचे सीजन पासेसची पाहणी केली असता एकूण 225 सीजन पासेस बनावट आढळून आले.

हेही वाचा -

  1. Dandia Fake Pass Case: 'फर्जी' वेब सिरीज पाहून बनवले दांडियाचे बनावट पास, चौघांना अटक
  2. तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास तयार करणाऱ्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद
  3. सिंधुदुर्गात बनावट ई-पास तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.