ETV Bharat / state

राणा दाम्पत्याला मोठा धक्का, हनुमान चालिसा पठण प्रकरणी न्यायालयानं याचिका फेटाळली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 5:43 PM IST

Updated : Dec 19, 2023, 6:25 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Hanuman Chalisa Case : अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) प्रकरणात न्यायालयानं निर्णय दिला आहे.

मुंबई Hanuman Chalisa Case : नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी रााणा (Ravi Rana) यांनी 'मातोश्री' या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या (Matoshree) घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) केलं होतं. या प्रकरणी त्यावेळी या दोघांवरी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. रवी राणा आणि नवनीत राणा यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का आहे.

आरोपपत्र निश्चिती होणार : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा या दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास असलेल्या 'मातोश्री' या ठिकाणी जबरदस्तीने हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यानुसार राणा दाम्पत्य आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल देखील झाले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हे दाखल केले होते. या संदर्भात दोषमुक्तता मिळावी असा अर्ज राणा दाम्पत्याने मुंबईच्या विशेष न्यायालयात दाखल केला होता. न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी हा अर्ज आणि यातील मागणी फेटाळून लावली आहे. तसेच 5 जानेवारी 2024 रोजी याबाबत आरोपपत्र निश्चिती होणार असल्याचे देखील निर्णयात नमूद केलं आहे.

काय आहे प्रकरण? : हनुमान चालिसा पठण पडले महागात : 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या घरासमोर राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करणार होते. यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम होते. या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं राणा दाम्पत्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल केले होते. परंतु, हे दाखल गुन्हे राजकीय सुडापोटी दाखल केल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 153A, 34,37 सह मुंबई पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यातच नंतर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही वाढवण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. नवनीत राणांना लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार? पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण
  2. संसदेत उड्या मारणारे युवक महुआ मोइत्रांची माणसं - खासदार नवनीत राणा
  3. "सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध", मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही
Last Updated :Dec 19, 2023, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.