ETV Bharat / state

Praful Patel Met Nawab Malik : नवाब मालिक कोणासोबत? भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी सांगितले...

author img

By

Published : Aug 15, 2023, 9:10 PM IST

Updated : Aug 15, 2023, 9:41 PM IST

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (National Working President Praful Patel ) यांनी नवाब मलिक यांची मुंबईतील निवासस्थानी भेट (Praful Patel met Nawab Malik) घेतली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती. यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांसोबत कोणतीही राजकीय चर्चा नसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी गेल्याचे पटेल यांनी सांगितले.

Praful Patel Met Nawab Malik
Praful Patel Met Nawab Malik

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना (Nawab Malik getting bail ) वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्याचा जामीन (Nawab Malik getting bail ) मिळाल्यानंतर सोमवारी आपल्या घरी पोहचले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, (Ajit Pawar group state president Sunil Tatkare) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Ational working president Praful Patel) यांनी नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, सदिच्छा भेट असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर दिली.

राजकीय चर्चा नाही : मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात होते. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाल्यानंतर सोमवारी मलिक आपल्या घरी पोहोचले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे जाणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत. यातच मंगळवारी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांची घरी जाऊन भेट घेतली. गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही सोबत काम केले आहे. मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती पटेल यांनी दिली.

ईडीबाबत भाष्य करणार नाही : नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही कामाकडे लक्ष देऊ नये. राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या विविध घडामोडी सुरू आहेत, त्यामध्ये नवाब मलिक यांना आणू नये, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस मिळाल्या होत्या. त्यातील बहुतेक नेते आज अजित पवार गटासोबत असल्याचे चित्र आहे. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मला काहीही बोलायचे नसून, तुम्हला जो अर्थ काढायचा तो काढा.

शरद पवारांचे आशीर्वाद : पुण्यातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठकीवरुन राजकारण तापले आहे. आम्ही त्यावर चर्चा करू इच्छित नाही. शरद पवार आमचे दैवत आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. तसेच शरद पवार यांना भेटलो त्यावरुन वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. तसेच मनसेबाबत एनडीच्या बैठकीत विषय आल्यानंतर बोलू. आता यावर काही बोलू शकत नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Ajit pawar in Kolhapur: पुण्यातील बैठकीत लपून गेलेलो नाही, त्या गाडीत मी नव्हतो-अजित पवार
  2. Nawab Malik Bail Granted : अखेर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; 'हे' दिले कारण
  3. Nawab Malik Bail Rejected: राज्यात सत्तानाट्य घडताना नवाब मलिक यांचा मुक्काम तुरुंगातच... मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला जामिन
Last Updated :Aug 15, 2023, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.