ETV Bharat / state

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं'

author img

By

Published : Oct 26, 2020, 5:17 PM IST

Updated : Oct 26, 2020, 7:44 PM IST

भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत. आम्ही बोललो तर पळता भुई थोडी होईल, कपडे हातात घेऊन पळावे लागेल, अशी टीका राणे यांनी केली.

राणे
राणे

मुंबई - भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं. तसेच ताळमेळ नसलेले होतं, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानाबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत, असेही ते म्हणाले.

भाजप खासदार नारायण राणे

कालचा दसरा मेळावा हा पोलिसांचा वापर करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जसे प्रयत्न केले तसाच होता. राज्यामध्ये केलेली कामाबद्दल ते बोलले नाहीत. कोरोनामुळे सर्वांत जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. त्यावर बोलण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांना जणाची नाही. तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती, असे नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्री पदाला ते लायक नाहीत. 56 आमदारांवर बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे. ते घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतता. आता दोन दिवसांपूर्वी पिजऱ्यातून बाहेर पडत त्यांनी दौरा केला. स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का?, असा सवाल राणे यांनी केला.

बाळासाहेब माझ्यासमोर रडले -

मला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केला वाघ म्हणून बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना छळलं आहे. 2005 साली शिवसेनाचा दसरा मेळावा हा सेना भवनासमोर करायचा होता. पण त्यांनी स्वतः तिथे न घेण्याचा निर्णय घेऊन, सामनामध्ये जाहीर केलं. तेव्हा बाळासाहेब माझ्यासमोर रडले, असे नारायण राणे म्हणाले.

आम्ही बोललो तर पळता भूई थोडी होईल -

तुमच्यासाठी माझे निलेश आणि नितेश हे दोघेच पुरे आहेत. गेल्या 39 वर्षातं जे सेनेत बघितलं, ते सर्व सांगणे. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, तुम्ही काय केले. आम्ही बोललो तर पळता भुई थोडी होईल कपडे हातात घेऊन पळावे लागेल, असे राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना जीडीपी कळतो का -

मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी माणसांसाठी काय केले. शेण आणि गोमुत्रांची भाषा तोंडी शोभत नाही. उद्धव ठाकरे यांना जीडीपी कळत नाही. त्यांना अर्थव्यवस्थेबद्दल काहीच माहित नाही. महाराष्ट्राच्या प्रगत राष्ट्राला मंद मुख्यमंत्री भेटलाय, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे हे मराठ्यांचा द्वेष करतात -

वाघाची भाषा करणारा मुख्यमंत्री हा शेळपट माणूस आहे. उद्धव ठाकरे हे मराठ्यांचा द्वेष करतात. मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवा, असे आव्हान राणे यांनी केले. शिवसेनेचे कार्यकर्तेही तुम्हाला मुख्यमंत्री मानत नाहीत. हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत. पुढच्या वेळी फक्त 10 ते 15 आमदार येतील. 55 आमदार हे फक्त मोदींमुळेच आले. 25 वर्ष सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे राणे म्हणाले.

सुशांतचा खूनच झाला -

सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे, असा दावा राणे यांनी केला.

दसरा मेळाव्यात काय बोलले होते उद्धव ठाकरे -

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 'बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला' ही गोष्ट सांगत नारायण राणेंची तुलना बेडकाशी केली होती. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

Last Updated : Oct 26, 2020, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.