ETV Bharat / state

रेड अलर्ट : मुंबईकरांनो आज समुद्र किनारी जाऊ नका, पालिका आयुक्तांचे आवाहन

author img

By

Published : Jul 28, 2019, 2:37 AM IST

Updated : Jul 28, 2019, 7:20 AM IST

रेड अलर्ट : मुंबईकरांनो आज समुद्र किनारी जाऊ नका, पालिका आयुक्तांचे आवाहन

सुट्टीच्या दिवशी मुंबईकर विशेषकरून समुद्रकिनारी चौपाटीवर जातात. समुद्राच्या पाण्याचाही आनंद घेतात. अनेकवेळा पाण्याचा अंदाज न आल्याने, भरतीची वेळ तसेच लाटांचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार असून मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या कारणाने मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन पालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या ट्विटर अकाउंटवरून केले आहे.

मुंबई - शहरासह उपनगरामध्ये हवामान खात्याने येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत वर्तवली असून आज समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागतील असा अंदाज आहे. या कारणाने मुंबईकरांनी आज समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी केले आहे. समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी पालिका प्रसाशनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

रेड अलर्ट : मुंबईकरांनो आज समुद्र किनारी जाऊ नका, पालिका आयुक्तांचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, बंगालच्या खाडीत उत्तर-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे उत्तर कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये 5 शहरात आगामी 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार आहे. हा वारा 40 ते 60 किलोमीटर वेगाचा असणार आहे. यामुळे मच्छिमारांनाही पुढील 48 तासात समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

सुट्टीच्या दिवशी मुंबईकर विशेषकरून समुद्रकिनारी चौपाटीवर जातात. समुद्राच्या पाण्याचाही आनंद घेतात. अनेकवेळा पाण्याचा अंदाज न आल्याने, भरतीची वेळ तसेच लाटांचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार असून मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या कारणाने मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन पालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या ट्विटर अकाउंटवरून केले आहे.

  • Heavy Rainfall Warning for Mumbai City and Suburbs

    As per warning from IMD about extremely heavy rainfall on 28th July 2019 citizens to note and avoid venturing around sea. For any assistance please dial 1916 helpline.

    Regards.
    Municipal Commissioner#MumbaiRains

    — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हवामान खात्याचा 'रेड अलर्ट' -
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 5 जिल्हात 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी 27 आणि 28 जुलैला तर मुंबई, रत्नागिरीसाठी 28 जुलैला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आगामी काही तासात हवामान खात्याने जोरदार पावसाची होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Intro:मुंबई - भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी २८ जुलैला रेड अलर्ट घोषित केला आहे. या काळात हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावेळेत समुद्रात जोरात वाराही वाहणार आहे. यामुळे मुंबईकरांनी आज रविवारी समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केले आहे.Body:भारतीय हवामान खात्याने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, बंगालच्या खाडीत उत्तर-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे उत्तर कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये ५ शहरात पुढील २४ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार आहे. हा वारा ४० ते ६० किलोमीटर वेगाचा असणार आहे. यामुळे मच्छीमारांनाही पुढील ४८ तासात समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

सुट्टीच्या दिवशी मुंबईकर विशेषकरून समुद्रकिनारी चौपाटीवर जातात. समुद्राच्या पाण्याचाही आनंद घेतात. अनेकवेळा पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच भरतीची वेळ तसेच लाटांचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा समुद्रात बुडून मृत्यू होतो. रविवारी समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार असून जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकारणाने मुंबईकरांनी समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

हवामान खात्याचा रेड अलर्ट -
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील ५ जिल्हात 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी २७ आणि २८ रत्नागिरी २७ जुलै आणि मुंबईसाठी २८ जुलैला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या काळात हवामान खात्याने जोरदार पावसाची होण्याची शक्यता वर्तवली आहे.

पालिका आयुक्तांचा म्यासेज -
Heavy Rainfall Warning for Mumbai City and Suburbs

As per warning from IMD about extremely heavy rainfall on 28th July 2019 citizens to note and avoid venturing around sea. For any assistance please dial 1916 helpline.

Regards.
Municipal Commissioner
#MumbaiRains

पालिकेच्या ट्विटची लिंक -
https://twitter.com/mybmc/status/1155166448072962052?s=19Conclusion:null
Last Updated :Jul 28, 2019, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.