ETV Bharat / state

BMC New Year Gift : नवीन वर्षात मुंबईकरांना महापालिकेकडून मिळणार गिफ्ट, अशा सुटणार शहरातील समस्या

author img

By

Published : Dec 31, 2022, 8:03 PM IST

मुंबई शहरातील रस्त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता मात्र महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) नागरिकांना नवीन वर्षाचे गीफ्ट ( People Will Get New Year Gift ) देणार आहे. नवीन वर्षात कोस्टल रोड ( Coastal Road Project ) प्रकल्प, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि मुंबईतील ४०० किलोमिटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यासह हिमालय पुलाच्या गर्डर टाकण्याचे कामही नवीन वर्षात करण्यात येणार आहे.

Breaking News

मुंबई - शहरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) केले जाते. याच अनुषंगाने महापालिकेकडून नागरिकांसाठी विविध प्रकल्प ( People Will Get New Year Gift ) सुरू केले आहेत. यापैकी कोस्टल रोड प्रकल्प ( Coastal Road Project ) नोव्हेंबर २०२३ मध्ये, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. १ जानेवारीपासून हिमालय पुलाचे गर्डर बसवले जाणार आहेत. तर मुंबईतील ४०० किलोमिटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरण ( Concretization Road Work In Mumbai ) करण्याच्या कामाला नव्या वर्षात सुरुवात होणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्प मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाचे ( Mumbaikar People Will Get New Year Gift ) काम हाती घेतले आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड पालिकेकडून बांधण्यात येत आहे. या प्रकाल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल ( Coastal Road Project ) रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरीत क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ झाला. आतापर्यंत कोस्टल रोडचे ६६ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प मुंबई शहर हे जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मुंबईत पर्यटन ( Mumbai Beautification Project ) वाढवण्यासाठी रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) यांच्या निर्देशानंतर मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

४०० किलोमिटर रस्त्याचे काँक्रीटीकरण मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे ( Concretization Road Work In Mumbai ) चांगले रस्ते निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईत ४०० किमीचे ५ हजार ८०० कोटी खर्चाच्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रिया मुंबई महापालिकेने काढल्या होत्या. प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने या निविदा रद्द करून नव्याने ६ हजार कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. सध्या ९ जणांनी निविदा भरली असून जानेवारी २०२३ मध्ये या निविदा उघडल्या जाणार आहेत. यामुळे मार्च २०२३ पर्यंत ४०० किलोमिटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हिमालय पुलाचे काम पूर्ण होणार - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai ) टाईम्स ऑफ इंडिया, मुंबई पोलीस मुख्यालय, अंजुमन इस्लाम कॉलेज, किल्ला कोर्ट, आझाद मैदान पोलीस स्टेशन याकडे ये जा करण्यासाठी रेल्वे प्रवासी हिमालय पुलाचा वापर करत होते. १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. अंधेरी येथील गोखले पूल ( Gokhale Bridge Mumbai ) कोसळल्यावर हिमालय पूल कोसळला होता. या पुलाचे काम सुरू असून नव्या वर्षात रविवारी १ जानेवारीला गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. गर्डर बसवल्यावर इतर कामे दीड महिन्यात होऊन हा पूल नागरिक आणि रेल्वे प्रवासी यांच्यासाठी खुला केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.