ETV Bharat / state

Police Custody Death पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात सीबीआयकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका

author img

By

Published : Dec 17, 2022, 12:31 PM IST

अग्नेलो वल्दारिस ( Agnelo Valdares Death In Police Custody) या मोबाईल चोराचा वडाळ्याच्या पोलीस ( Wadala Police Station ) कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयला ( CBI ) तपास करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने याप्रकरणात 8 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा अहवाल सादर केला. याप्रकरणी दोषी पोलिसांनी उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने सीबीआयचा अहवाल मान्य करत संशयीत पोलिसांची याचिका फेटाळून लावली आहे.

Mumbai High Court
उच्च न्यायालय

मुंबई - वडाळा रेल्वे पोलीस कोठडी मृत्यू ( Police Custody Death Case ) झालेल्या आरोपीच्या वडिलांनी 8 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) सीबीआयला या प्रकरणात तपास करण्याचे निर्देश दिले होते. सीबीआयने या 8 अधिकाऱ्यांना दोषी मानत त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा ( Murder Case ) दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. या विरोधात पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ( Mumbai High Court ) दाखल केली होती. शुक्रवारी न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.

कोठडीत पोलिसांकडून छळवणुकीच्या प्रकरणात वाढ कोठडीत पोलिसांकडून होणाऱ्या छळवणुकीच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले आहे. वडाळा रेल्वे पोलीस ( Wadala Railway Police ) कोठडीत अग्नेलो वल्दारिस याचा मृत्यू (Agnelo Valdares Died In Police Custody ) झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील 8 पोलिसांविरोधातील प्रथमदर्शनी पुराव्यांचा विचार करता त्यांना खुनाच्या आरोपांना सामोरे जावे लागेल, असे मत स्पष्ट करत न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळली आहे.

पोलिसांनी थेट अत्याचार केल्याचा पुरावाच मिळणार पोलिसांविरोधातील छळाच्या किंवा कोठडीतील मृत्यूच्या ( Police Custody Death ) घटनांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांच्या सहभागाचा प्रत्यक्ष पुरावा समोर येतो. अनेकदा अन्य पोलीस कर्मचारी गप्प राहणे पसंत करतात आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी सत्याचा विपर्यासही करतात. पोलीस कोठडीतील आरोपीवर होणारी छळवणूक वाढत आहे. या टप्प्यावर न्यायालयाने हस्तक्षेप न केल्यास त्या प्रवृत्तीच्या पोलिसांना प्रोत्साहन मिळेल. त्यांना एखाद्या गरीब मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्यांना कोणतीही हानी अथवा त्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचा विश्वास निर्माण होईल. पोलिसांवर थेट अत्याचार केल्याचा पुरावाच मिळणार नाही, असेही न्यायमूर्ती अमित बोरकर ( Justice Amit Borkar ) यांनी आदेशात नमूद केले. तसेच न्यायालयात सादर केलेल्या माहिती आणि पुराव्यावरून आरोपी पोलिसांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत केलेली कारवाई प्रथमदर्शनी पुरेशी योग्यच असल्याचे नमूद केले. याचिकाकर्त्यांच्या कृत्यामुळे वल्दारिस ( Agnelo Valdares Died In Police Custody ) कोठडीतील मृत्यू झाला आहे का? हा विशेष न्यायालयातील खटल्याचा भाग असून त्यावर विशेष न्यायालय निर्णय घेईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण 4 एप्रिल 2014 रोजी अग्नेलो वल्दारिस (Agnelo Valdares Died In Police Custody ) या युवकाला मोबाईल चोरीचा गुन्ह्यातंर्गंत अटक करण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वल्दारीसची पोलीस कोठडीत ( Police Custody Death ) मानसिक व शारीरिक छळवणूक केली असा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. तर दंडाधिकारी न्यायालयात नेत असताना त्याने पोलिसांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो बाजूने भरधाव जात असलेल्या लोकलला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. त्याविरोधात अग्नेलोच्या वडिलांनी न्यायालयात जीआरपीशी संलग्न संबंधित पोलिसांविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) सीबीआयकडे ( CBI ) वर्ग केले. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी 17 सप्टेंबर रोजी जितेंद्र रामनारायण राठोड, अर्चना मारुती पुजारी, शत्रुगण तोंडसे, तुषार खैरनार, रवींद्र माने, सुरेश माने, विकास सुर्यवंशी आणि सत्यजित कांबळे या आठ आरोपीं पोलिसांविरोधात भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. त्यासह हत्येचा आरोप निश्चित करण्यात यावेत, अशी वल्दारिसच्या कुटुंबीयांची याचिका मंजूर केली. त्याविरोधात त्यांनी आता उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.