Mumbai HC On Rape Case : संमतीने लैंगिक संबंध कलम 376 नुसार बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा अधोरेखित

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Oct 27, 2023, 6:55 PM IST

Mumbai HC On Rape Case

Mumbai HC On Rape Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एन आर बोरकर आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने फौजदारीची सुनावणी करत असताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Court Decision On Rape Case) दोन प्रौढ व्यक्तीत एकमेकांच्या संमतीनं लैंगिक संबंध झाले, तर कलम 376 नुसार तो बलात्कार ठरू शकत नाही. त्यामुळे त्या संबंधातील पुण्यातील पीडित व्यक्तीनं दाखल केलेली फौजदारी याचिका निकाली काढली. त्यामुळे आरोपी विरुद्धचा गुन्हा रद्द झाला. (Consensual sex is not rape)

मुंबई Mumbai HC On Rape Case : पुण्यातील एका संस्थेमध्ये आरोप असणारा पुरुष वरच्या पदावर काम करत होता. 2019 मध्ये त्याच्या हाताखाली पीडित महिला कार्यरत होती. (consensual sex) काम करत असताना एकमेकांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं. पुढे त्यांचे संमतीने शरीर संबंध देखील झाले होते. (Mumbai High Court)


लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार : दोघांचे संमतीने शरीर संबंध झाल्यानंतर काही कारणावरून त्यांच्यामध्ये बेबनाव झाला. त्यानंतर तक्रारदार महिलेने तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये तिनं म्हटलं की, आरोपी पुरुषानं तिला लग्नाबाबत वचन दिलं होतं. लग्नाचं आमिष दाखवल्यामुळेच मी त्याच्यासोबत शरीरसंबंधाला तयार झाले. परंतु, त्यानं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला. त्यामुळे त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार त्याच्यावर खटला चालवून योग्य ती शिक्षा त्याला व्हावी.


आरोपीकडून पीडितेला मारहाण : आरोपीच्या वतीनं वकिलांनी बाजू मांडली. पीडित महिला आणि आरोपी पुरुष हे एकमेकांना ओळखत होते. एका संस्थेत काम करत होते. त्यांच्यामध्ये संमतीनं शरीर संबंध झाले. त्याच्यानंतर काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि तिनं बलात्कार झाल्याची तक्रार केली. तर पीडित महिलेच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली की, तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि मग शरीरसंबंध प्रस्थापित केले. कथितरित्या आरोपीनं पीडितेला मारहाण केली. तसंच मारण्याची धमकी देखील दिली व आमिष दाखवून बलात्कार केला. त्याच्यामुळंच पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 दाखल केले. 2022 रोजी यासंदर्भात पोलिसांकडून दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आलेलं होतं.


संमतीनं शरीर संबंध झाल्याचं कबूल : आरोपीच्या वतीनं वकील हर्षल सुनील पाटील यांनी न्यायालयामध्ये महिलेकडून दाखल झालेलं प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर मांडलं. त्यात तिनं संमतीनं शरीर संबंध झाल्याचं कबूल केलेलं आहे. तसंच आरोपीकडून महिलेला झालेली नुकसान भरपाई देखील दिलेली आहे. या तिच्या प्रतिज्ञापत्रावरून दोघांचे शरीर संबंध सहमतीचे होते हे स्पष्ट होते. न्यायालयात ही बाजू समोर आल्यानंतर त्या महिलेकडून देखील आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं गेलं.


तर तो बलात्कार ठरत नाही : न्यायालयानं जारी केलेल्या आदेश पत्रात नमूद केलं की, प्रौढ व्यक्तींमध्ये संमतीनं जर शरीरसंबंध झाला असेल तर भारतीय दंड विधान कलम 376 अंतर्गत तो बलात्कार ठरत नाही. या संदर्भात वकील विनोद सातपुते यांनी म्हटलेलं आहे की, एक स्त्री अनेक पुरुष विवाहित असो की नसो; परंतु त्यांची संमती असल्यानंतर असे संबंध प्रस्थापित झाले तर तो बलात्काराचा गुन्हा ठरत नाही. हे अनेकवेळा अनेक प्रकरणांमध्ये सिद्ध झालेलं आहे. 26 ऑक्टोबर रोजी खंडपीठानं याबाबतचं आदेश पत्र जारी केलं.

हेही वाचा:

  1. नागपूर : दिव्यांगं मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षाचा सश्रम कारावास
  2. Gangrape : धक्कादायक ! पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार
  3. Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.