ETV Bharat / state

मुंबईमध्ये भर पावसात गणरायाला निरोप; 32 हजार मूर्तींचे विसर्जन

author img

By

Published : Sep 7, 2019, 11:34 PM IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी भर पावसात गौरी-गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात आज ३२ हजार गौरी आणि गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईमध्ये भर पावसात गणरायाला निरोप

मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी भर पावसात आज गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३२ हजार गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईमध्ये भर पावसात गणरायाला निरोप


शहरात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.

हेही वाचा - गौरी-गणपतीच्या विसर्जनाकरिता भांडुपच्या शिवाजी तलावावर गर्दी


मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा गजर सुरु होता. पावसाची रिपरिप सुरू असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रिया, तरुण- तरूणींसह, अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचे विसर्जन पार पाडले. विसर्जन स्थळी मुंबई महानगरपालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

Intro:मुंबई - ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने भर पावसात आज गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात आज रात्री 9 वाजेपर्यंत 32 हजार गौरी आणि गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. काल पाच दिवसांच्या 29,781 तर दीड दिवसांच्या 61,929 गणेशमुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे.  Body:सोमवारी 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरु होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रीया, तरुण- तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.  

32 हजार गौरी, गणपतींचे विसर्जन -
रात्री 9 पर्यंत 32 हजार 383 गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 261 सार्वजनिक, 28488 घरगुती गणेशमूर्त्या तर 3634 गौरींचा समावेश आहे. कृत्रिम तलावात 4669 गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 16 सार्वजनिक, 4129 घरगुती गणेश मुर्त्या तर 524 गौरींचा समावेश आहे.

या आधी पाठवलेल्या बातमीचे vis वापरावेत
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.