ETV Bharat / state

ट्रोल करणे, एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे हे सुसंस्कृत समाजासाठी चांगले नाही - खासदार सुळे

author img

By

Published : Oct 11, 2020, 8:04 PM IST

आम्ही सत्तेत आहोत म्हणून टीका जरूर करा. पण, शिवीगाळ होणार असेल तर मात्र आवाज उठवला गेला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना संबोधताना खासदार सुळे
विद्यार्थ्यांना संबोधताना खासदार सुळे

मुंबई - कोरोना संकटकाळात तंत्रज्ञान मदतीला आले. पण, याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियावर एखाद्याला शिवीगाळ करणे, ट्रोल करणे, एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे, हे केले जात असेल तर सुसंस्कृत समाजाला आणि देशाला चांगले नाही. त्यामुळे समाजात चुकीचे काही घडत असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी यावर आवाज उठवला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

आज (दि. 11 ऑक्टोबर) खासदार सुप्रियाताई सुळे यांनी डोंबिवली येथील जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण, येणारे शैक्षणिक, धोरण याबद्दल काय वाटते व तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि बातम्या यामध्ये पुढे काय धोरण असले पाहिजे, यासह अन्य विषयांवर झूमद्वारे संवाद साधला.

त्या म्हणाल्या, प्रेसवर नियंत्रण आणायचे आहे, असे माझे अजिबात मत नाही. एकमेकांवर टीका करा ती केली पाहिजे. आम्ही सत्तेत आहोत म्हणून टीका जरूर करा. पण, शिवीगाळ होणार असेल तर मात्र आवाज उठवला गेला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो महाराष्ट्र व भारत अपेक्षित होता. तो या लोकशाहीत आपले वागणे बसते का? तर ते नाही बसत. त्यामुळे या गोष्टीचा विचार नवीन पिढीने केला पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ड्रग्जबाबत बोलताना ड्रग्ज थांबवण्यासाठी, मुले का ड्रग्ज घेत आहेत याचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न करा. ते थांबवण्यासाठी प्रयत्न करा, असे खासदार सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांचे मानसिक संतुलन ढासळले, हेल्पलाईनवर 5 महिन्यांत 16 हजार कॉल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.