ETV Bharat / state

'पीएमसी बँकेच्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारने दिलासा द्यावा'

author img

By

Published : Sep 16, 2020, 9:56 PM IST

पीएमसी बँकेच्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकाने दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

मुंबई - पीएमसी बँकेच्या 9 लाख खातेधारांना त्यांच्या ठेवी कधीपर्यंत मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे एक निश्चित कालमर्यादा केंद्रसरकारने जाहीर करुन खातेदार व गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या सभागृहात केली.

लोकसभेत बँकिंग नियमन (सुधारणा) विधेयक 2020 बाबत झालेल्या चर्चेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. तीन महिन्यात केंद्र सरकारने पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय केले, अशी विचारणाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गेल्या जून महिन्यात सरकारने याबाबत वटहुकूम काढण्याची घोषणा केली होती. पण, याबाबत पुढे काहीच झाले नाही याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजीही व्यक्त केली.

बँकींग नियमन (सुधारणा) विधेयक 2020 अंतर्गत केंद्र सरकार पीएमसी बँकेला 6 हजार 500 कोटी रुपयांचे भांडवल कधी देणार, असा प्रश्नही खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. यासोबतच खातेदार व गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकेची मालमत्ता विकण्याची तयारी चालविली आहे. याबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला विचारला. याशिवाय वर्षभरापूर्वी आलेल्या विलनीकरणाच्या प्रस्तावाला मंजूरी का मिळाली नाही याबाबतही खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे विचारणा केली.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्षांच्या लेखी आश्वासनानंतर 'त्या' शिक्षकाचे 'शोले स्टाईल' आंदोलन मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.