ETV Bharat / state

Mumbai Airport : काय सांगताय... छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात 9 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

author img

By

Published : Dec 5, 2022, 6:07 PM IST

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Shivaji Maharaj International Airport ) 9 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. 7 डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ( International Civil Aviation Day ) म्हणुन साजरा केला जाते. मुंबईतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport

मुंबई - मुंबई आर्थिक राजधानी अनेक आंतरराष्ट्रीय गजबजलेलं शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखल जात असे. सुमारे १ हजार 850 एकर परिसरात विस्तारलेला हे विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हे सर्वात जवळ आहे . हे विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीत सर्वात व्यस्त असे विमानतळ आहे. 7 डिसेंम्बर 2022 आंतराष्ट्रीय नागरी उड्डाण ( International Civil Aviation Day ) दिवस साजरा केला जातो. त्यामित्ताने जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबत सविस्तरपणे...

दोन्ही धावपट्टीचा असा होतो वापर - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल 1 सांताक्रुझ देशांतर्गत तर टर्मिनल 2 छत्रपती शिवाजी महाराज अर्थात सहार पूर्वीचे नाव होते. सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही राष्ट्रीय उड्डाणेसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण 10-15 मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकच धावपट्टी, इतर सुविधांचा एरसाइड सर्व्हिसेससाठी उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात.

देशांतर्गत उड्डाणासाठी टर्मिनल १ टर्मिनल - हे टर्मिनल एप्रिल १९९२मध्ये बांधले गेले. स्पाइसजेट, गो फर्स्ट, इंडिगो एरलाइन्स, एयर एशिया,आकासा एयरसह इतर छोट्या विमानकंपन्यांची उड्डाणे येथून होतात.देशात नोव्हेंबर 2022 पर्यन्त 36 लाख प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये एकाच दिवशी देशांतर्गत 90 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता.


टर्मिनल दोन वरून 60 पेक्षा अधिक कंपन्यांची विमान उड्डाणे - टर्मिनल 2 आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे होतात.येथून सध्या 60 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगोएरलाइन्स, विस्तारा, एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी 10:०० ते संध्याकाळी 6:30 दरम्यान दिवसातील 45 टक्के उड्डाणे होतात. रात्री 10:०० नंतर आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा असते.


आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या आणि विमान उड्डाणे - सन 2014 ह्या वर्षी 780 व्यावसायिक विमान उड्डाणे तर, तर 2014 मध्ये 3 लाख 75 हजार प्रवासी, 2021 मध्ये कोरोना काळात परिणाम झाल्याने 3 लाख 10 हजार प्रवासी होते. यावर्षी एकूण 5 हजार 754 व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली. तर, एकूण 9 लाख 30 हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आता पर्यन्त प्रवास केला आहे. तासाला 50 पेक्षा आणि दिवसभरात 900 पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे सध्या होत आहेत. तर 4 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली.


विमानतळ सुविधा - दोन्ही टर्मिनल मिळून सुमारे 1 हजार 692 गाळे आहेत .विमानात चढण्यासाठीचे पूल 6 हजार 699 आहेत. तर, चेक-इन टेबले 33 हजार 998, कार पार्किंग 12 लाख 3 कार थांबतील इतकी जागा आहे. गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहिती दर्शकावर सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकसित केली आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे.

विमानतळ अदानी समूहाकडे - जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाकडे 74 टक्के हिस्सा आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जनसंपर्क अधिकारी यांनी ईटीव्ही भारताला सांगितले," कोरोनाच्या काळात विमान वाहतूक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. पण, हळूहळू हे क्षेत्र रुळावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 17 सप्टेंबर रोजी एकाच दिवसात 1 लाख 30 हजार पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवेश केला. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून एका दिवसातील प्रवाशांची ही सर्वाधिक संख्या आहे. विमानतळाच्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी 95 हजार 80 प्रवाशांनी टर्मिनल 2 वरून प्रवास केला. तर 35 हजार 294 प्रवाशांनी टर्मिनल 1 वरून प्रवास केला. त्या दिवशी मुंबई विमानतळावरून 839 उड्डाणे चालवण्यात आली. तर 18 सप्टेंबर 2022 रोजी एकाच दिवशी दीड लाख प्रवाश्यानी प्रवास केला .तर ह्या यावर्षी आता पर्यन्त एकूण 9 लाख पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. दोन्ही टर्मिनलवर मोफत वायफाय सुविधा देखील आहेत."

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.