ETV Bharat / state

Maharashtra omicron Cases - राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 68 तर कोरोनाचे 12 हजार 160 नवे रुग्ण

author img

By

Published : Jan 3, 2022, 10:01 PM IST

Updated : Jan 3, 2022, 10:32 PM IST

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 3 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 11 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोरोना
कोरोना

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 3 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 11 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनासह नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात झपाट्याने वाढत आहेत. आज 12 हजार 160 रुग्णांचे निदान झाले. राज्यातील रुग्णसंख्या यामुळे 67 लाख 12 हजार 28 इतकी झाली आहे. तर 1 हजार 748 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 14 हजार 358 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.05 टक्के इतका आहे. दिवसभरात 11 रुग्णांचा आज मृत्यू झाला. मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 93 लाख 70 हजार 95 चाचण्या केल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.68 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1 हजार 96 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 52 हजार 422 सक्रिय ( Active Patients in Maharashtra ) रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचे आतापर्यंत 578 रुग्ण

राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 68 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण मुंबईत ( Omicron Patients in Mumbai ) आढळून आले आहेत. पुण्यात 14 ( Omicron Patients in Pune ), नागपूरमध्ये 4 ( Omicron Patients in Nagpur ), पुणे ग्रामीण ( ( Omicron Patients in Pune ) ) आणि पनवेल ( Omicron Patients in Panvel ) येथे अनुक्रमे 3, कोल्हापूर ( Omicron Patients in Kolhapur ), रायगड ( Omicron Patients in Raigad ) , नवी मुंबई ( Omicron Patients in Navi Mumbai ), सातारा ( Omicron Patients in Satara ) भागात अनुक्रमे 1 रुग्ण सापडला आहे. ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या यामुळे 578 झाली आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आजपर्यंत 2 हजार 375 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 23 हजार 630 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 51 हजार 735 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी ( RT PCR Test ) करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 301 आणि इतर देशातील 188 अशा एकूण 490 जणांची आरटीपीसीआर तर आजपर्यंतच्या 2 हजार 375 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 166 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 7 हजार 928

ठाणे - 156

ठाणे महापालिका - 762

नवी मुंबई पालिका - 512

कल्याण डोबिवली पालिका - 238

वसई विरार पालिका - 289

नाशिक - 51

नाशिक पालिका - 166

अहमदनगर - 30

अहमदनगर पालिका - 17

पुणे - 135

पुणे पालिका - 464

पिंपरी चिंचवड पालिका - 150

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई - 368

पुणे महापालिका - 63

पिंपरी चिंचवड - 36

पुणे ग्रामीण - 26

ठाणे महापालिका - 13

पनवेल - 11

नागपूर - 10

नवी मुंबई - 9

हेही वाचा - Mumbai Schools Closed : मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

Last Updated : Jan 3, 2022, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.