ETV Bharat / state

MLA Anil Parab : रामदास कदम यांना योग्यवेळी उत्तर देणार - अनिल परब

author img

By

Published : Mar 7, 2023, 8:42 PM IST

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आज मुंबईत धुळवड साजरी केली. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनीही जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले आहे. धुळवड असल्याने रामदास कदमांवर काही बोलणार नसल्याचे ते म्हणाले.

MLA Anil Parab
MLA Anil Parab

रामदास कदम यांना योग्य वेळी उत्तर देणार - अनिल परब

मुंबई : संपूर्ण देशभरात आज होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. संपूर्ण देश आज विविध रंगांनी धावून निघाला. अशात देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई देखील मागे नव्हती. मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील आपली धुळवड साजरी केली. ठाकरे गटाचे नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार अनिल परब यांनी देखील होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं आहे.


सर्वांना होळीच्या शुभेच्छा : आमदार अनिल परब दरवर्षी त्यांच्या मित्र परिवारासोबत मुंबईच्या वांद्रे येथे धुळवड साजरी करतात. यावर्षी देखील अनिल परब यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत होळी साजरी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अनिल परब म्हणाले की, "सोमवारी सर्वत्रच होलिकेचं दहन करण्यात आलं. या होलिकेच्या तेजाप्रमाणे सर्वांच्याच आयुष्यात सुखाचे दिवस आणि आजच्या धुळवळीप्रमाणे सर्वांचं आयुष्य आनंदमय राहो याच सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो. लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन ही धुळवड साजरी करावी. मी देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या मित्र व परिवारासोबत होळी साजरी करण्यासाठीच चाललो आहे."


सर्वांना योग्य वेळी त्यांची उत्तरे देणार : यावेळी पत्रकारांनी अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील सभेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 'उद्धव ठाकरे शंभर वेळा जरी खेडला आले, तरी इथे योगेश कदमच जिंकतील अशी अशी टीका केली होती. यावर आम्ही प्रश्न विचारला असता अनिल परब यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले की, "आज आनंदाचा सण आहे. धुळवळीत सर्वांनी विविध रंगांनी हा सण साजरा करावा. ही राजकीय धुळवड नाही. त्यामुळे विरोधक कोण काय बोलतील यावर मी आज कोणतंही भाष्य करणार नाही. या सर्वांना योग्य वेळी त्यांची उत्तरे दिली जातील." अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दिली आहे.


अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप : शिवसेनेत जेव्हा दोन गट पडले त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. रामदास कदम यांचे चिरंजीव, खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात अनिल परब कट रचत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्याच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील सभेनंतर पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. मात्र, अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर बोलणं टाळलं.

हेही वाचा - Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पातून राज्याला काय? शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.