ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न - उदय सामंत

author img

By

Published : Jul 6, 2023, 9:45 PM IST

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. राज्यात सुरू असलेल्या घडामोडीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांच्यासह भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Political Crisis
मंत्री उदय सामंत व उद्धव ठाकरे

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात नवनवीन राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर मंत्री उदय सामंत यांच्यासह भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



हा ज्याचा त्याचा प्रश्न? : या भेटीबाबत बोलताना मंत्री उदय संबंध म्हणाले की, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असेल तर त्या भेटीत काय चर्चा झाली माहीत नाही. परंतु उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येत असतील तर हा त्यांचा विषय आहे. कोणी कोणासोबत जावे व कोणी कोणासोबत यावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याचेही उदय सामंत म्हणाले आहेत. अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता असून, शिंदे गटात प्रवेश केलेले काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. अशा अनुषंगाने उदय सामंत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही बरंच काही सांगणारी आहे.



काड्या लावण्याचं काम : या भेटीबाबत बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, अभिजीत पानसे व संजय राऊत यांची झालेली भेट ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. कारण संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काड्या लावण्याचे काम केले आहे. यासर्व गोष्टींचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच्या वहिनींच्या हातात असल्यामुळे, एकत्र येण्याचा प्रस्ताव हा मनसेने सामना कार्यालयाच्या ऐवजी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर मांडायला हवा होता, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.


हेही वाचा -

  1. Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज...
  2. Thackeray Brother Banner : महाराष्ट्राला ठाकरे बंधूंची गरज; बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ
  3. MNS Shivsena Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेने टाळी दिल्याची चर्चा; राज्यभरात झळकले बॅनर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.