ETV Bharat / state

Uday Samant : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मंत्री उदय सामंत यांनी उडवली खिल्ली

author img

By

Published : Nov 17, 2022, 2:50 PM IST

Updated : Nov 17, 2022, 4:28 PM IST

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे. या भारत जोडो यात्रेमुळे भारत जोडला जात नाही, तर काँग्रेस नेत्यांचे वजन कमी झाले आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली

मुंबई - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे. या भारत जोडो यात्रेमुळे भारत जोडला जात नाही, तर काँग्रेस नेत्यांचे वजन कमी झाले आहे. दुसरीकडे सामंत यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या संदर्भातील विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. त्यांचे वक्तव्य त्यांच्या आघाडीतील सहकाऱ्यांना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली

संविधानावर हल्ला चढवत: राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. देशातील दलित आणि आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप पक्ष दररोज संविधानावर हल्ला चढवत आहे.

स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा उल्लेख: यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा उल्लेख केला. इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासी समाजाचं प्रतिक आहेत, ते तुमच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत.

Last Updated : Nov 17, 2022, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.