ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी केली गुजरातमधून दोन बुलेट बाईक चोरांना अटक

author img

By

Published : Apr 11, 2023, 1:38 PM IST

Mumbai Crime News
दोन बुलेट बाईक चोरांना अटक

मुंबईच्या बोरिवली पश्चिम मुंबई पोलिसांनी बुलेट बाईक चोरून पळून जाणाऱ्या दोन बुलेट बाईक चोरांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दोन बुलेट बाईक चोरांना अटक

मुंबई : मुंबई पोलिस ठाण्यात 29 मार्च रोजी तक्रारदाराने बुलेट बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. आरोपींचा मागमूसही लागला नाही. आरोपींंना शोधण्यासाठी त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले. तेव्हा त्यांना बुलेट बाईक चोरीला गेल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा फोटो काढून आजूबाजूच्या लोकांना दाखवला. आरोपीची ओळख गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून निष्पन्न झाली. पोलिसांनी आरोपी आपला मित्र आहे, असे सांगून त्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा त्यांना आरोपी हे गुजरातमधील असल्याचे तपासात सिद्ध झाले.


आरोपीला बुलेटसह रंगेहात अटक : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी एक पथक तयार केले. त्यानंतर आरोपीला बुलेटसह गुजरातच्या बहादूरगड कच्छ येथून एका रंगेहाथ अटक केली. दुसऱ्या साथीदाराला तपासात अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली बुलेट बाईक ही सांताक्रूझ पोलिस ठाणे येथून चोरीला गेलेली होती. अटक करण्यात आलेले संजय शिवभाई कोळी आणि पुनेश वेला कोळी हे आरोपी गुजरातचे रहिवासी आहेत.

बुलेट चोरीची घटना : हे बुलेट चोर मेकॅनिकचे काम करतात. गुजरातमध्ये आणखी किती बुलेट बाईक चोरल्या? चोरीच्या बुलेट कोणाला विकल्या, याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत. या गाड्यांची अंदाजे किंमत 2 लाख 75 हजार रूपये आहे. 28 मार्च ते 29 मार्चदरम्यान ही बुलेट चोरीची घटना घडली होती. रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट होती. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन अनोळखी इसम हे मोटार सायकल चोरी करून जाताना दिसून आले. त्यावरून जवळपास राहणाऱ्या नागरिकांकडे त्यांचे फोटो दाखवून आरोपीबाबत तपास केला. आरोपी पूनेश वेला कोळी बहादूरगड, कच्छ, गुजरात येथील राहणारा असल्याचे समजले. त्यांनंतर गुजरात राज्य येथे तपास करून आरोपीचे लोकेशन मिळवून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून त्याच्या साथीदाराच्या पत्ता घेवुन दुसरा आरोपी संजय शिवाभाई कोळा यास ताब्यात घेतले.

हेही वाचा : Online Fraud: ऑनलाइन मागवली दारू, क्रेडिट कार्डद्वारे उकळले दोन लाख; राजस्थान येथून आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.