ETV Bharat / state

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, कशी आहे मतदान केंद्रावर परिस्थिती? - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 8:15 AM IST

Mumbai Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) देशभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे. तर आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं बघायला मिळतंय.

Voting begins in North East Mumbai Lok Sabha Constituency
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात (reporter)

मुंबई Mumbai Loksabha Election : आज (20 मे) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, दिंडोरी, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 13 मतदारसंघांचा समावेश आहे. तर राज्यात तापमानाचा पारा वाढला असल्यामुळं मतदारांनी आज सकाळीपासूनच मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचं चित्र मुंबईतील ईशान्य लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतंय.

मतदारांमध्ये उत्साह : राज्यात वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढलाय. मतदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. मात्र, दुपारच्या वेळेत कमालीचा उकाडा आणि गर्मी असल्यामुळं मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावरती रांगा लावल्या आहेत. ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भांडुप पश्चिम येथे मतदारांनी एक किलोमीटरपर्यंत रांग लावल्याचं बघायला मिळालं.

संजय दिना पाटील विरुद्ध मीहिर कोटेचा लढत : ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात संजय दिना पाटील यांच्या नावाचे एकाच दिवशी चार डमी अर्ज दाखल करण्यात आले होते. तसंच दोनच दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळं या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असून येथे कोण जिंकतंय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तसंच संजय दिना पाटील भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणूक 2024 : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदानाला सुरुवात - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज होणार मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 5th Phase
  3. लोकसभा निवडणूक 2024 ; मतदानाची लगबग, साहित्य पोहोचू लागलं मतदान केंद्रांवर - LOKSABHA ELECTION
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.