Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार

author img

By

Published : Jan 5, 2023, 8:17 PM IST

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या एका दिवसात दोन मोठ्या घोषणा, पुण्यात 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार, म्हाडाच्या घरांसाठी (mhada lottery 2023 updates applying) एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. (Mhada Lottery) त्यामुळे कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करणं सहज शक्य होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकरी मिलिंद बोरीकर

मुंबई: आपले घर व्हावे अशी प्रत्येक बेघराची इच्छा असते. (Mhada Lottery 2023 ) आणि आता इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हाडाने अनोख्या पद्धतीने अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात केलेली आहे. (Mhada Lottery) संपूर्णत: ऑनलाइन घरी बसून अँड्रॉइड मोबाईलद्वारे किंवा संगणक द्वारे आपण यासाठी एकदाच नोंदणी करायची आहे. (mhada lottery 2023 updates applying) प्रत्येक वेळेला नोंदणी करण्याची गरज नाही. (registration starts) युजर फ्रेंडली अँप द्वारे देखील आपण आपल्या घरासाठीचा अर्ज भरू शकतो.घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हाडाच्यावतीने अर्ज नोंदणी आजपासून सुरू होत आहे.

म्हाडाच्या घरासाठी नवीन संगणकीय सोडत प्रणाली Integrated Housing Lottery Management System एकीकृत संगणकीय गृह सोडत व्यवस्थापन प्रणाली प्रथमच म्हाडाच्या वतीने घरांसाठी अर्जांची ५ जानेवारी 2023 पासून नोंदणी सुरू होत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साह्याने घराच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया हाताळली जाणार आहे. (mhada housing) यामध्ये स्वयंचलित प्रणालीमध्ये नागरिकांनी डिजिटल स्वरूपात अर्ज भरायचा आहे. त्यासोबत कागदपत्रे देखील त्यात अपलोड करायची आहे. संगणकीय प्रणाली म्हाडाने नवीनच सुरू केली आहे.

पुन्हा नोंदणीची गरज नाही: याआधी घराच्या साठी घराच्या साठी अर्जदार अर्ज करीत असायचे. आधी संगणकीय लॉटरीमध्ये जर पात्र झाले तरच पुढे प्रक्रिया जात होती. आता मात्र यामध्ये बदल करण्यात आलेला असून एकदाच नोंदणी करायची आणि नोंदणीच्या वेळीच आवश्यक कागदपत्रे म्हाडाच्या वेबसाईटवर किंवा भाडाने दिलेल्या ॲपवर अपलोड करायची .त्यामुळे पुन्हा पुन्हा सर्व प्रक्रिया करण्याची गरज नाही. एकदा तुमचा अर्ज क्रमांक आणि अधिकृत दस्तावेज यांची खात्री झाली की प्रत्येक अर्जदाराला आपले प्रोफाईल पेज निर्माण करता येईल आणि त्या प्रोफाइल पेजवरच आपल्या अर्जाची स्थिती त्याला ठराविक मुदतीमध्ये देण्यात येईल.

यामुळे भ्रष्टाचाराला बसेल आळा: आधी ज्या रीतीने अर्ज भरले जात होते आणि अर्ज भरल्यानंतर प्राधिकृत अधिकारी सर्व दस्तावेज सर्व अर्ज हा खात्रीपूर्वक तपासून पडताळणी करून मग तो नक्की करत होता. त्याला आता फाटा दिलेला आहे. संगणकामध्ये ब्लॉकचेन प्रणाली बसवल्यामुळे संगणकच आता नोंदणीच्या सुरुवातीलाच आपल्या दस्तावेजाचे पडताळणी तपासणी करेल . त्यानंतर आपला अर्ज ग्राह्य धरला जाईल .आणि हे सर्व काम संगणकच करेल मानवी हस्तक्षेप यामध्ये पूर्णतः टाळला गेलेला आहे. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा बेकायदा व्यवहार त्याला यामध्ये आता जागा नाही. असे म्हाडाचे म्हणणे आहे.आधी सोडत प्रक्रिया पूर्ण व्हायची आणि मग अर्जदार पात्र होत होता आता मात्र नोंदणी करताना सुरुवातीलाच अर्जदार पात्र होईल हा महत्त्वाचा बदल संगणकीय रीतीने केला गेला आहे.

महिनोंमहिने वाट पहावी लागणार नाही: यापूर्वी म्हाडामध्ये ज्या प्रणाली आणि प्रक्रिया राबवल्या जात होता त्यामध्ये मनुष्यबळ भरपूर वापरला जात होते आणि एक वर्षाचा काळ जात होता. त्यामुळे अनेक लोकांना घर मिळणामध्ये उशीर होत होता .ते नागरिक घरापासून वंचित राहत होते. त्यामुळे अनेक प्रकरण न्यायालयामध्ये गेले. पुन्हा त्यामध्ये वेळ लागायला लागला. मात्र नवीन संगणक प्रणाली मध्ये याला फाटा देण्यात आल्यामुळे सर्व काम पटापट वेळेत होणार आहे.असे म्हाडा प्राधिकरणाचे म्हणणे आहे. आणि मानवी हस्तक्षेपाला त्यामध्ये थारा नाही यामुळेच घराची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली की ताबा प्रक्रिया सुरू होईल.ते पूर्ण केले की त्वरित घर मिळणार आहे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका: यासंदर्भात माडा मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले की," पूर्वी माडाच्या घरांच्या संदर्भात सोडत होत होती म्हणजे आधी लॉटरी व्हायची त्यामधून तुमचा अर्ज निश्चित व्हायचा त्यानंतर तुमचे कागदपत्र बरोबर असतील तर तुम्ही पात्र होत होते. मात्र या सगळ्या प्रक्रियेला उशीर लागत होता .त्याच्यामुळे जनतेला वेळेत घर मिळणं होत नव्हतं. त्यामुळेच अनेक प्रकरणा न्यायप्रविष्ठ देखील झालेली आहे.

मात्र आता आम्ही नवीन ब्लॉकचेन प्रणाली संगणकमध्ये वापरलेली आहे. ज्याद्वारे संगणकावर बसून किंवा मोबाईल ॲप द्वारे कोणताही महाराष्ट्राचा रहिवासी यामध्ये पटकन अर्ज भरू शकतो. पुढे त्यांनी नमूद केले की पूर्वी घरांचा ताबा मिळण्यासाठी महिने वर्ष एवढा कालावधी लागायचा मात्र आता आम्ही जी नवीन संगणकीय प्रणाली सुरू केलेली आहे त्याद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण केले की थोड्याच अवधीमध्ये घराचा ताबा अर्जदारांना मिळू शकेल.

कोणत्या उत्पन्न गटांसाठी: अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अत्यल्प उत्पन्न असलेल्या अर्जदारांना आता अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च गटातील उत्पन्न गटासाठी च्या घरांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. माढा प्राधिकरणाने 2022 मध्ये उत्पन्न मर्यादित बदल केला अत्यल्प गटासाठी एका वर्षासाठी सहा लाख रुपये पर्यंत उत्पन्न मर्यादा असावी अल्प गटासाठी सहा लाख 1000 ते 9 लाख रुपये पर्यंतची वार्षिक उत्पन्न मर्यादा तर मध्यम गटासाठी 9 लाख एक ते बारा लाख रुपयापर्यंतची मर्यादा आणि उच्च उत्पन्न गटासाठी 12 लाख एक रुपये ते 18 लाख रुपये पर्यंतची उत्पन्न मर्यादा नक्की करण्यात आलेली आहे.

या संदर्भात लागणारी कागदपत्रे: मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले की," महाराष्ट्राचा जो रहिवासी असेल त्यांच्यासाठी ही घरांची योजना आहे यासाठी डोमीसाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड ,जर जातीच्या संदर्भातलं जर पुरावा लागत असेल तर जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरण भरल्याची पावती किंवा आयकर भरल्याचा पुरावा अशा विविध प्रकारच्या अधिकृत कागदपत्रांची अपलोड करण्याची गरज आहे. यासंदर्भात आमच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती दिलेली आहे त्यावर नागरिकांनी भेट देऊन ती सर्व माहिती पहावी आणि विहित नमुन्यांमध्येच सर्व कागदपत्रे अपलोड करावे. तसेच युजर फ्रेंडली ॲप यासाठी माडाने तयार केलेला आहे ते आजपासून थोड्या वेळानंतर सुरू करण्यात येईल ते ॲप अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड केल्यावर एकदा तुमचा अर्ज नोंदणी झाला की पुन्हा पुन्हा अर्ज नोंदणी करण्याची गरज नाही.

नवीन संगणकीय प्रणालीची वैशिष्ट्ये: ब्लॉकचेन तंत्रज्ञान प्रणालीच्या साह्याने माडाच्या घरासाठी अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे. यामध्ये पूर्वी 21 प्रकारचे कागदपत्रे लागत होते. आता केवळ सात ते आठ प्रकारचेच कागदपत्र घराच्या अर्ज नोंदणीसाठी अपलोड करावे लागणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही .पूर्वी अधिकृत अधिकारी कागदपत्र तपासणी करत होते .आता संगणक प्रणाली द्वारेच हे सर्व कागदपत्र तपासणी केली जाणार आहे. आणि याची माहिती अर्जदाराला स्वतः त्याच्या खात्यामध्ये मिळू शकेल. तसेच मोबाईलवर संदेश देखील मिळेल.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकदा अर्जदाराचा सर्व डेटा हा भरला गेला की तो डेटा आधार, आयकर विभाग भारत सरकार अशा विविध सरकारी विभागासोबत लिंक केला जाणार आहे त्यामुळे साहजिकच एका अर्जदाराला एकच घर घेता येईल एकापेक्षा अधिक घर त्याला खरेदी करता येणार नाही हे महत्त्वाची बाब या संगणक प्रणालीमुळे कार्यरत झालेली आहे. म्हाडाच्या खालील संकेतस्थळावर जाऊन महाराष्ट्राचे रहिवासी यावर अर्ज भरू शकतात. तसे अधिक माहिती आणि प्रणाली बाबत मार्गदर्शनासाठी अर्जदारांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा 02269468100, https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Konkan/ या घरांच्या संदर्भात अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन पुढील प्रमाणे टाईप करावे आणि ॲप डाऊनलोड करावे. Integreated Housing Lottry Management System IHLMS 2.0

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.