ETV Bharat / state

ST Workers Strike : पहिली बैठक संपली; सरकारकडून अंतरिम पगारवाढ करण्याचा प्रस्ताव

author img

By

Published : Nov 24, 2021, 12:10 PM IST

Updated : Nov 24, 2021, 3:55 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू झाली आहे. यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतदेखील उपस्थित आहेत.

meeting at sahyadri guest house over st workers strike mumbai
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्रीवर बैठक

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू झाली संपली. (ST Workers Strike) एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमधील पहिली बैठक संपली. राज्य सरकारकडून अंतरिम पगारवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. (meeting at sahyadri guest house over st workers strike mumbai)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक

दुसऱ्या बैठकीत काय?

चर्चा करण्यासाठी हॉलमधून एसटी कामगार शिष्टमंडळ बाहेर आले आहे. तर पगारवाढी बरोबरच पगारात सातत्य ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. शिष्टमंडळातील सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची हॉल बाहेर चर्चा सुरू आहे. दुसऱ्या बैठकीत एसटी कामगार शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहे.

पहिल्या बैठकीत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित आहेत. तर सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, एसटी कर्मचाऱ्यांचे दहा जणांचे शिष्टमंडळ सह्याद्रीवर उपस्थित आहे.

हेही वाचा - ST Workers Strike : मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम राहणार - नवनीत राणा

Last Updated : Nov 24, 2021, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.