ETV Bharat / state

निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे; थकित पगार जमा झाल्याने मार्डचा निर्णय

author img

By

Published : Aug 14, 2020, 11:58 PM IST

लातूर, अंबेजोगाई, नांदेड, औरंगाबाद आणि मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना जून-जुलैचा पगार मिळाला नव्हता.त्यामुळे या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 15 ऑगस्टला संपाचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी थकित पगार (स्टायपेंड) जमा झाल्याने 15 ऑगस्टचा निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे.

mard doctors strike
निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई- राज्यातील काही शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मागील दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळाला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 15 ऑगस्टला संपाचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी थकित पगार (स्टायपेंड) जमा झाला आहे. त्यामुळे शनिवारी (15 ऑगस्ट) होणारा संप मागे घेण्यात आल्याची माहिती डॉ. अमित अवचट, अध्यक्ष, नांदेड मार्ड यांनी दिली आहे.

लातूर, अंबेजोगाई, नांदेड, औरंगाबाद आणि मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना जून-जुलैचा पगार मिळाला नव्हता. त्यात त्यांना ज्या निधीतून पगार दिला जातो, तो निधीच संपल्याची माहिती समोर आल्याने पुढेही पगार होणार की नाही हा मोठा प्रश्न होता. संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करुनही निराशाच पदरी पडल्याने त्यांनी 15 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. संपाचा इशारा देणाऱ्यांमध्ये मराठवाड्यातील चार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा समावेश होता.

मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना रुग्णसेवा-आरोग्य यंत्रणेचा कणा असणाऱ्या निवासी डॉक्टरांनीच संपाचा इशारा दिल्याने ऐन कोरोना संकटात आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेत अखेर सरकारने शुक्रवारी थकित पगाराचा प्रश्न निकाली काढला आहे. पुढील आठ महिन्याच्या पगाराची ही तरतूद केली आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.