ETV Bharat / state

RESIDENT DOCTORS STRIKE : मार्ड डॉक्टरांचा आजपासून संप; अतिदक्षता विभाग राहणार सुरू

author img

By

Published : Jan 2, 2023, 11:11 AM IST

वर्षाच्या सुरुवातीलाच निवासी डॉक्टरांनी संप ( RESIDENT DOCTORS STRIKE ) पुकारला आहे. राज्यभरात निवासी डॉक्टरांचा संप असल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने हा संप पुकारला असून, काही मागण्या प्रलंबित आहेत. (intensive care unit will remain open) सातत्याने या मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे २ जानेवारी पासून निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने राज्यभरातील रुग्णालयातील डॉक्टर्सने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ( STRIKE WILL START FROM Today IN MUMBAI)

RESIDENT DOCTORS STRIKE
निवासी डॉक्टरांचा संप

निवासी डॉक्टरांचा संप


मुंबई : राज्यभरात निवासी डॉक्टरांची संख्या जवळपास 5000 च्या वर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर संपावर गेल्यास ( RESIDENT DOCTORS STRIKE ) आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला असला तरी अतिदक्षता विभागात कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता डॉक्टरांकडून घेण्यात आलेली आहे. अतिदक्षता विभाग सुरू राहील यासाठी निवासी डॉक्टर काम करणार आहेत. तर तिथेच आरोग्य व्यवस्था कोलमडनार नाही. यासाठी रुग्णालयांनी प्राध्यापक डॉक्टरांना प्रचारन केले आहे. सध्या केवळ ओपीडी बंद करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. ( intensive care unit will remain open ) मात्र आंपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम पडेल असा इशारा सेंट्रल मार्ड प्रेसिडेंट अविनाश दहिफळे यांनी दिला आहे. तर तेथेच जे जे रुग्णालयात असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या समस्या सातत्याने जे जे प्रशासनाला सांगूनही त्या पूर्ण झाल्या नाहीत राहण्याचे मोठी समस्या निवासी डॉक्टरांना जे जे रुग्णालयात भेडसावत आहे. मात्र याबाबत कोणीच लक्ष घालत नसल्याचे जेजे हॉस्पिटल चे मार्ड संघटना अध्यक्ष शुभम सोनी यांनी सांगितले आहे. (STRIKE WILL START FROM Today IN MUMBAI )


निवासी डॉक्टरांच्या मागण्या : महाडच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या जवळपास दीड हजार पदांची निर्मिती करणे, निवासी डॉक्टरांचे वस्तीगृहात सुधारणा करण्यात यावी, संयोगी व सहाय्यक पदांची लवकरात लवकर भरती करणे, सर्व शासकीय आणि महानगरपालिकांच्या रुग्णालयात महागाई भत्ता सुरू करणे, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांचे वेतन समान करणे.

हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी काम करत असताना मार्ग डॉक्टर आणि समोर येणाऱ्या काही समस्या याबाबत चर्चेची विनंती मार्डकडून करण्यात आली होती. मात्र यासाठी वाट पाहूनही ३१ डिसेंबरपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून डॉक्टर संपावर जाणार आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर रोज कामाचा ताण असतो. निवासी डॉक्टरांची संख्या वाढवण्यात यावी ही मुख्य मागणी डॉक्टरांची आहे. मात्र या मागणीबाबत प्रशासन किंवा सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज होणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील जे जे रुग्णालय, कुपर रुग्णालय, नाय रुग्णालय, सायर येथील रुग्णालय आणि केईएम रुग्णालय येथे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.

डॉक्टरांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष : निवासी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, BMC, GMC च्या डॉक्टरांनी महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेकडे अनेक वेळा खालील मागण्या मांडल्या आहेत. ज्यांची दखल घेतली गेली नाही. ज्याकडे संबंधित प्राधिकरणाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे आणि तत्काळ त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांच्या संदर्भात महागाई भत्ता प्रलंबित आहेत व तात्काळ देणे. नायर रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या 8 महिन्यांच्या कोविड काळातील थकबाकीचा आणि KEM आणि कूपर रुग्णालयाच्या 2 महिन्यांच्या थकबाकीचा भरणा त्वरित मिळावा. मात्र शासनाने डॉक्टरांच्या या मूलभूत समस्यांकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.