ETV Bharat / state

कांदिवलीत घरातच सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना, एक कोटी 17 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 4:19 PM IST

Action on Drugs : मुंबई येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता मुंबई पोलीस (Mumbai Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कांदिवली पश्चिम येथील समता वेल्फेअर सोसायटीत रूम नंबर सातमध्ये सुरू असलेला अमली पदार्थाचा छोटेखानी कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तसंच मालवणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MD Drugs
एमडी ड्रग्जचा कारखाना

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त अजय कुमार बंसल

मुंबई Action on Drugs : मुंबई पोलीस यांनी सोलापूर, नाशिक येथील एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना गेल्या वर्षी उध्वस्त केला होता. त्यानंतर आता मालवणी पोलिसांनी (Malwani Police) कांदिवली पश्चिम येथील समता वेल्फेअर सोसायटीत रूम नंबर सातमध्ये सुरू असलेला अमली पदार्थाचा छोटेखानी कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी आबरार इब्राहिम शेख (वय 30) आणि नूर आलम मेहबूब आलम चौधरी (वय 24) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती, परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त जयकुमार बंसल यांनी दिलीय.

17 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत : या गुन्ह्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 (क), 22 आणि 22 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिम येथील समता वेल्फेअर सोसायटीतील रूममधून पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर एक ग्राम एमडी ड्रग्ज, शंभर किनारे या नशेच्या बॉटल्स आणि एकूण पाचशे तीन ग्राम उच्च प्रतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त केला आहे. ज्याची किंमत 1 कोटी 60 हजार इतकी आहे. त्याचप्रमाणं एमडी हा अमली पदार्थ बनवण्याचे केमिकल साहित्य आणि मशीन असा 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आरोपीला केली अटक : 5 जानेवारीला मालवणी पोलीस ठाण्याच्या सर्वेलन्स पथकाने आरोपी अब्रार इब्राहिम शेख याला, एक ग्राम एमडी आणि शंभर थिनरच्या बाटल्यांसह अटक केली होती. या आरोपीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने त्याच्याकडे सापडलेलं एमडी हे ड्रग्ज नूर आलम मेहबूब आलम चौधरी यांच्याकडून घेतल्याची माहिती दिली.



15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी : 9 जानेवारीला या गुन्ह्यातील आरोपी नूरचा शोध घेत असताना, गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे आणि निगराणी पथकाने कांदिवली पश्चिम येथील समता वेल्फेअर सोसायटीत छापा टाकला. तेथे वॉन्टेड आरोपी नूर आलम मेहबूब आलम चौधरी (वय 24) हा एमडी (अमली पदार्थ) बनवताना साहित्यसह लॅबमध्ये सापडला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या रूमची झडती घेतली असता, एकूण पाचशे तीन ग्राम उच्च प्रतीचा एमडी (अमली पदार्थ) आढळून आला. या अमली पदार्थाची किंमत एक कोटी साठ लाख इतकी आहे. त्यानंतर मालवणी पोलिसांनी नूर आलम मेहबूब आलम चौधरीला 10 जानेवारीला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. ओडिसातून गांजाची मुंबईत तस्करी; पोलिसांनी ड्रग्ज माफीया लक्ष्मीभाईसह साथिदाराला ठोकल्या ओडिसात बेड्या
  2. ललित पाटील प्रकरणात ससूनच्या डॉक्टरला अटक, रविंद्र धंगेकरांनी 'त्या' अधिकाऱ्याच्या फोन रेकॉर्डची चौकशीची केली मागणी
  3. साकीनाका पोलिसांची धडक कारवाई, 9 कोटींचं ड्रग्ज जप्त, दोन नायजेरियन अटकेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.