ETV Bharat / state

...ही तर अपयशाचीच वर्षपूर्ती - रामदास आठवले

author img

By

Published : Nov 26, 2020, 5:33 AM IST

Updated : Nov 26, 2020, 6:59 PM IST

शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले. सरकार स्थापनेच्या वेळेस मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 'हात' देत सरकार स्थापन केले. भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन करत एकच खळबळ उडवून दिली. आता या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षाचे सरकारला येऊन आता वर्ष पूर्ण होत असताना आठवले यांनी या युतीवरही टीका केली आहे.

ramdas athawale
रामदास आठवले

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला उद्या 26 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुभेच्छा देतो. मात्र, या एका वर्षात या सरकारने कोणतीच ठोस कामे केली नाहीत. तसचे ते कुठल्याच घटकाला न्याय देऊ शकलेले नाही. सरकारने शेतकरी, दलित, आदिवासी इतकेच काय सर्वसामान्यांसाठीही काही केले नाही. त्यामुळे ही वर्षपूर्ती अपयशीच म्हणावी लागेल, अशा प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीवर 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले. सरकार स्थापनेच्या वेळेस मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 'हात' देत सरकार स्थापन केले. भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन करत एकच खळबळ उडवून दिली. आता या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षाचे सरकारला येऊन आता वर्ष पूर्ण होत असताना आठवले यांनी या युतीवरही टीका केली आहे.

बाळासाहेब असते तर ही 'युती' झालीच नसती -

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही युती कधी होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, अशी युती झाली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली आहे. मात्र, आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर चित्र वेगळे असते आणि अशी युती झालीच नसती.

केंद्रीय मंत्री यांनी 'ईटीव्ही भारत'शी साधलेला संवाद.
शेतकऱ्यांचा सात बारा कोरा काही झालाच नाही -

या एका वर्षात सरकारने कोणतेही उल्लेखनीय आणि कुठल्याही घटकाला दिलासा देणारे निर्णय घेतले नाही. तर कोरोना काळातही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळायला हवी होती तशी हाताळली गेली नाही. दुसरीकडे ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीसारखी संकट राज्यावर ओढवली. शेतकऱ्यांचे तर खूपच मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा या शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. शिवसेना सतत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची भाषा करत होती. अगदी फडणवीस सरकारच्या काळातही शिवसेना यासाठी आग्रही भूमिका घेत होती. मात्र, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शेतकऱ्यांचा सात बारा काही कोरा झालाच नाही, अशी टीकाही आठवलेंनी केली.

हेही वाचा - ई़डी प्रकरण : 'राजकीय नेत्यांना त्रास देणं ही भाजपाची जुनी सवय'

दलित-आदिवासी वाऱ्यावरच -

हे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. मात्र, दलित-आदिवासी इतर मागासवर्गीयही या सरकारच्या काळात दुर्लक्षित-उपेक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत. मागासवर्गीयांच्या पदोन्नती आणि राखीव जागांचा निर्णय रेंगाळलेला आहे. तेव्हा हे सरकार या घटकालाही न्याय देऊ शकले नसल्याचा आरोप आठवले यांनी केला.

आपल्या 'कर्मा'नेच सरकार पडेल -

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, हे सरकार स्थापन झाल्याच्या दिवसापासून ते आतापर्यंत हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. कोणत्याही क्षणी सरकार पडेल, असा दावा भाजपाकडून सातत्याने केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नुकतेच दोन महिन्यात सरकार पडेल, असे भाकीत करत आता खळबळ उडवून दिली आहे. याविषयी आठवले यांना विचारले असता त्यांनी नरेंद्र मोदी असो वा देवेंद्र फडणवीस वा चंद्रकांत पाटील या कुणालाही सरकार पाडण्यात रस नाही. आम्हाला सरकार पाडायचे नाही. तशी गरजही नाही. कारण हे सरकार आपल्या कामामुळेच स्वतःच एक दिवस पडणार आहे, असे आठवले म्हणाले. त्यानंतर आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, असा मला विश्वास आहे. तसेच 105 जागा असताना कसे सरकार स्थापन करू, असा प्रश्न अनेकांना आहे. मात्र, त्यावेळी आम्ही हे शक्य करून दाखवू, असाही दावा त्यांनी केला.

10 पैकी फक्त 3 गुण -

महाविकास आघाडी सरकारने या एका वर्षात काहीच केले नाही. कोरोनाची परिस्थिती असो वा ओला दुष्काळ, अतिवृष्टीसारखी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारच्या कामगिरीवर आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच या सरकारच्या वर्षभराच्या कामाची गुणपत्रिका देताना 10 पैकी केवळ 3 गुण आठवले यांनी दिले आहेत.

Last Updated : Nov 26, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.