ETV Bharat / state

Todays Top News : आज दिवसभरात राज्यात काय घडणार, जाणून घ्या एकाच क्लिकवर

author img

By

Published : Dec 25, 2022, 7:10 AM IST

आज जगभरात नाताळ सण साजरा ( Christmas celebration today ) करण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची ( PM modi ) मन की बात ( mann ki baat ) तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद, सोलापूर दौरा यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )

Todays Top News
आज दिवसभरात राज्यात काय घडणार

मुंबई : आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती, पंतप्रधान मोदींची मन की बात, मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार, आज जगभरात नाताळ सण साजरा ( Christmas celebration today ) करण्यात येणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )

  • आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु : जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा ( Christmas celebration today ) होत आहे. आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु, पर्यटनस्थळी गर्दी वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. वर्षाअखेर आणि ख्रिसमस यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
  • आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती : देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळी सदैव अटल येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भाजप अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. ( birth anniversary of atalbihari Vajpayee )
  • आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. तसेच, कोरोना टेस्टिंग ट्रेसिंग वाढवणार तर लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान मोदींची मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM modi ) यांच्या मन की बात ( mann ki baat ) या कार्यक्रमाचा 96 वा भाग आज प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना पार्श्वभीवर, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात यावर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.
  • आनंद परांजपेंना अटक होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय. त्यामुळे आनंद परांजपे यांना पोलीस अटक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. ( Anand Paranjape arrest )
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद, सोलापूर दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता जनजागृती मोहिमेत सकाळी अकरा वाजता सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करमाळा येथे आदिनाथ सहकारी साखर कारखाना २७ वा गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.
  • भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड : हिमाचलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड होणार आहे. निवडीसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिमल्यात होणाऱ्या बैठकीत नाव जाहीर होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.