ETV Bharat / state

वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे लढवणार निवडणूक, अनिल परब यांचे सुचक वक्तव्य

author img

By

Published : Aug 31, 2019, 1:57 AM IST

Updated : Aug 31, 2019, 7:58 AM IST

युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी आज वरळी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात गटप्रमुखांनी केली. या मागणीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी शिक्कामोर्तब करत विधानसभा निवडणुकीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असे म्हटले.

आदित्य ठाकरे

मुंबई - युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी आज वरळी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात गटप्रमुखांनी केली. या मागणीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी शिक्कामोर्तब करत विधानसभा निवडणुकीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असे त्यांनी म्हटले.


वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ए प्लस मतदारसंघ आहे. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारे मतदार संघातील दिग्गज या एका मंचावर उपस्थित आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे, असे मत अनिल परब यांनी भाषणात व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश देखील वरळी येथे शिवसैनिकांना देण्यात आले. यामुळे शिवसेना सर्व इतर पक्षाचे डिपॉझिट जप्त करू शकते, अशी पार्श्वभूमी आता वरळी विधानसभेची झाली आहे.


विधानसभेत या मतदारसंघातून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर 145 जागा जिंकायला हव्या. त्यासाठी आदित्य ठाकरे यांना या विधानसभेत अडकवून न ठेवता त्यांना महाराष्ट्रात प्रचार करून देत प्रत्येकाने आदित्य ठाकरे होऊन मतदाराकडे गेले पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्यासारखा कमी वयाचा चेहरा निवडणुकीत उतरल्यास व उद्धव ठाकरे यांनी त्याला परवानगी दिल्यास ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल. आणि याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागेल. आदित्य ठाकरे सिनेटच्या निवडणुकीत उतरले तेव्हा 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आताही ते जिंकून वेगळा करिष्मा घडवतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.


अनिल परब यांच्या मागणीचे आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केले. आदित्य ठाकरेंना 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

Intro:मुंबई - युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे अशी मागणी आज वरळी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात गतप्रमुखांनी केली. या मागणीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी शिक्कामोर्तब करत विधानसभा निवडणुकीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असे म्हटले.Body:वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ए प्लस मतदारसंघ आहे. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारे या मतदारसंघातील दिग्गज या एका मंचावर उपस्थित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे असं भाषणात अनिल परब यांनी मत व्यक्त केलं.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश देखील वरळी येथे शिवसैनिकांना देण्यात आले.
यामुळे शिवसेना सर्व इतर पक्षाचे डिपॉझिट जप्त करू शकते अशी पार्श्वभूमी आता वरळी विधानसभेची झाली आहे.
विधानसभेत या मतदारसंघातून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर 145 जागा जिंकायला हव्या. त्यासाठी आदित्य ठाकरे यांना या विधानसभेत अडकवून न ठेवता त्यांना महाराष्ट्रात प्रचार करून देत प्रत्येकाने आदित्य ठाकरे होऊन मतदाराकडे गेलं पाहिजे.
आदित्य ठाकरे यांच्यासारख्या कमी वयाचा चेहरा निवडणुकीत उतरल्यास व उध्दव ठाकरे यांनी त्याला परवानगी दिल्यास ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल. आणि याकडे संपूर्ण जगाच लक्ष लागेल. आदित्य ठाकरे सिनेटच्या निवडणुकीत उतरले तेव्हा 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आताही ते जिंकून वेगळा करिष्मा घडवतील असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.Conclusion:अनिल परब यांच्या मागणीचे आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला.
या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे अाणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते.
Last Updated : Aug 31, 2019, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.