ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार आमचे गुरू; आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार, प्रफुल्ल पटेल यांचा दावा

author img

By

Published : Jul 5, 2023, 8:39 AM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे गुरू आहेत. त्यांच्या आदरामुळेच आम्ही त्यांचा फोटो लावला आहे. मात्र कौटुंबीक नात्यात राजकारण येऊ नये, असे वाटते असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावाही केला आहे.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्रात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपले गुरू आहेत. त्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो. मात्र पक्षातील ध्येय धोरणांमुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त राष्ट्रवादीचे आमदार असल्याचा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

शरद पवार हे आमचे गुरू असल्याने आदर : शरद पवार हे आमचे गुरू असल्यामुळे त्यांचा आम्हाला नेहमीच आदर असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. आम्ही त्यांचा नेहमीच आद करू. त्यांचा फोटो आम्ही त्यांना असलेल्या आदरामुळेच वापरत आहोत. त्यांचा आम्ही कुठेही अनादर केला नसल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवारांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीत बंड केले आहे. त्यामुळे शरद पवार यांना चांगलाच हादरा बसला आहे. सगळे आमदार परत येतील असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्याबद्दल कोणतेही दुमत नसल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवीचे 51 आमदारांनी दिले होते पत्र : एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदारांना घेऊन सूरत आणि गुवाहाटी येथे गेले होते. तेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळेल याची खात्री होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 51 आमदारांनी शरद पवार यांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र दिले होते. यामध्ये कोणताही वैचारिक फरक नसून आपण शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबतही नक्कीच जाऊ शकतो, असेही या आमदारांचे मत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.

कौटुंबिक नात्यात राजकारण येऊ नये : अजित पवार यांनी बंड केल्यामुळे त्यांचे काका शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कौटुंबिक नात्यात राजकारण येऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले. मी स्वत:ला पवार कुटुंबाचा भाग मानतो, त्यामुळे माझ्या पवार कुटुंबाला माझ्या शुभेच्छा आहेत. हे स्वीकारण्याचे आवाहन आपण फक्त शरद पवारांनाच करू शकतो. त्यांना जे सर्वोत्तम वाटते, त्यानुसार ते स्वत:चा निर्णय घेऊ शकतात असेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

Maharashtra Political Crisis : शरद पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी; अजित पवारांनीही बैठकीसाठी पाठवली नोटीस

Maharashtra Political Crisis : शरद पवार भेटीत काय बोलले? अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय केला रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.