ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राहुल नार्वेकर अ‌ॅक्शन मोडमध्ये... शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस

author img

By

Published : Jul 8, 2023, 11:45 AM IST

शिवसेनेच्या ( शिंदे गट) ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठविली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणण मांडण्यासाठी नोटीस पाठविली आहे. आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

Maharashtra Political Crisis
राहुल नार्वेकर अपात्रता नोटीस

मुंबई: शिवसेनेच्या ( शिंदे गट) ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची सूचना दिली आहे. दोन्ही गटातील आमदारांना सात दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. ठाकरे गटाने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत विधानसभा अध्यक्षांना अपातत्रेसंदर्भात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या याचिकेनंतर राहुल नार्वेकर लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दोन्ही गटातील आमदारांच्या सुनावणीनंतर अपात्रतेच्या कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नसल्याने ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत केली आहे.

कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही- कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरिता यापूर्वी विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना, पक्षप्रमुख कोण याबाबतची माहिती मागविली होती. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेसंदर्भात पाच याचिका आलेल्या आहेत.

16 आमदार अपात्र होतील अंबादास दानवेंना विश्वास- सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेच्या कारवाईला त्यामुळे आता वेग येणार आहे. शिंदे गटाचे आमदारांची यामुळे धाकधूक वाढली आहे. शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून मागवली होती. मागील आठवड्यात ही प्रत विधानसभा कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी पक्ष कोणाचा होता, यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अध्यक्षांना त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

शिंदे गटाच्या या आमदारांवर टांगती तलावर

  1. एकनाथ शिंदे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी - पाचपाखडी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून लावत, भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. ते शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत.
  2. ब्दुल सत्तार : अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत.
  3. संदीपान भुमरे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे मंत्री संदीपान भुमरे आमदार असून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
  4. संजय शिरसाट : 2009, 2014 व 2019 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत.
  5. तानाजी सावंत : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघाचे तानाजी सावंत आमदार असून आरोग्यमंत्री आहेत. यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली आहेत.
  6. यामिनी जाधव : शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव यांचा राजकीय प्रवास असून 2019 च्या भायखळा विधानसभा निवडणुकीत पहिल्याच टर्ममध्ये आमदार झाल्या आहेत. त्यांचे पती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे मारण्यात आले होते.
  7. चिमणराव पाटील : जळगाव जिल्ह्यातील पारोळा-एरंडोल मतदार संघाचे चिमणराव पाटील विद्यामान आमदार असून शिवसेनेची जळगाव जिल्ह्यात ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत.
  8. भरत गोगावले : रायगडमध्ये तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असूनशिंदे गटाची प्रतोद म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
  9. लता सोनवणे : लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघाच्या पहिल्यांदाच टर्मच्या आमदार आहेत.
  10. प्रकाश सुर्वे : मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे प्रकाश सुर्वे विद्यमान आमदार असून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
  11. बालाजी किणीकर : अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून आमदार बालाजी किणीकर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. किणीकर सध्या शिवसेना शिंदे गटाचे खजिनदार म्हणून काम करत आहेत.
  12. अनिल बाबर : अनिल बाबर सांगली खानापूर - आटपाटी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. 1999 पासून सलग पाच वर्षे शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेत निवडून आले आहेत.
  13. महेश शिंदे : कोरेगाव विधानसभा मतदार संघातून महेश शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी 2014 पर्यंत भाजपचा प्रचार केला होता.
  14. संजय रायमुलकर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आमदार यांनी आजवर समृद्धी महामार्गाच्या काम विरोधात आंदोलन छेडले होते.
  15. रमेश बोरनारे : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदार संघाचे रमेश बोरनारे विद्यमान आमदार यांच्यावर यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा आहे.
  16. बालाजी कल्याणकर : बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कल्याणकर नांदेड शहरातील एकमेव आमदार असून त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलावर आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Political Crisis: शिवसेनेत बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रततेचा लवकर निर्णय घ्या- ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.