ETV Bharat / state

MVA Mahamorcha : महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, शरद पवार कडाडले

author img

By

Published : Dec 17, 2022, 5:39 PM IST

Updated : Dec 17, 2022, 6:47 PM IST

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चा (Mahavikas Aghadi Hallabol Morcha) शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्रात आपण कधीही असा राज्यपाल पाहिला नाही, अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली. महापुरुषांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य शोषित वर्गासाठी शिक्षणाची दालने खुली केली, हे सत्ताधारी पक्ष विसरले का? (Latest news from Mumbai) असा सवाल शरद पवार यांनी या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. (Mumbai Crime)

MVA Mahamorcha
शरद पवार

शरद पवार यांचे भाषण

मुंबई : आजवर महाराष्ट्रात अनेक राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshari) झाले. त्या राज्यपालांचा नावलौकिकही होता. मात्र हे राज्यपाल नाहीत. राज्यपालांची हकलपट्टी करा, अशी मागणी ही शरद पवार यांनी महामोर्चादरम्यान (Mahavikas Aghadi Hallabol Morcha) आपल्या भाषणातून केली आहे.

MVA Mahamorcha
महाविकास आघाडी मोर्चा

कर्नाटकमधील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील व्हावा - संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सत्तर वर्ष आधी देखील मोर्चे निघाले होते. कर्नाटकमधील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, ही या मोर्चाची भावना होती. मात्र ते होऊ शकले नाही; पण आताही महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. (Latest news from Mumbai) महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, असे ज्वलंत मुद्दे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाषणातून मांडले. (Mumbai Crime)

शरद पवार यांचा सवाल : सत्तेतील एक मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितले अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करतात. पण या महापुरुषांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य शोषित वर्गासाठी शिक्षणाची दालने खुली केली, हे सत्ताधारी पक्ष विसरले का? असा सवाल शरद पवार यांनी या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.