ETV Bharat / state

Todays Top News : राज्यासह देशभरातील काय घडणार, जाणून घेऊया एकाच क्लिकवर

author img

By

Published : Dec 11, 2022, 7:16 AM IST

Updated : Dec 11, 2022, 7:25 AM IST

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन करणार आहेत, जळगाव दूध संघाचा निकाल देखिल लागणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )

Todays Top News
महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ( Inauguration of Samriddhi Highway ) होणार आहे. तसेच पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन करणार आहेत, जळगाव दूध संघाचा निकाल देखिल लागणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )

  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
  • मेंदौस वादळाचा परिणाम : राज्यात येत्या 3,4 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. तामीळनाडूला धडकलेल्या मेंदौसचक्रीवादळाच्या नंतरच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.
  • हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री आज घेणार शपथ : आज हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू आज शपथ घेणार आहेत. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक गहलोत उपस्थित राहणार आहेत, दुपारी १२ वाजता.
  • जळगाव दूध संघाचा लागणार निकाल : आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, सकाळी आठ वाजता. शहरातील रिंग रोड वरील सत्यवलभ हॉल या ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
  • पंतप्रधानांची गोवा भेट : पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन करणार आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला असून त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
  • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा : यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असतील. या कार्यक्रमात कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना स्कॉलरशिप वितरण दुपारी १.३० वाजता होईल.
  • आजच्या दिवशी 1946 मध्ये राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी झाली होती निवड : 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली. याला आताचा संसद भवन सेंट्रल हॉल म्हटले जाते. संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती जे. बी. कृपलानी होते. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड करण्यात आली.
Last Updated : Dec 11, 2022, 7:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.