ETV Bharat / state

Vinod Kadu withdraw from Konkan Teachers Constituency : महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष विनोद कडू यांची कोकण शिक्षक मतदार संघातून माघार

author img

By

Published : Jan 16, 2023, 8:08 PM IST

महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष विनोद कडू यांनी कोकण शिक्षक मतदार संघातून माघार घेतली आहे. तर शिंदे गटाचा पाठिंबा असलेले भाजपात गेलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उमेदवारी नक्की झाली. शिक्षक भारतीचा पाठिंब्याने धनाजी पाटील तर महाराष्ट्र विकास आघाडीकडून बाळाराम पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

Konkan Teachers Constituency
कोकण शिक्षक मतदार संघ

मुंबई : शिक्षक मंडळींचे लक्ष लागून असलेल्या महत्वाच्या निवडणुका पुढील काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण 5 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या वेळापत्रक नुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. तर 4 फेब्रुवारी रोजी मतदानाची सर्व प्रक्रिया होईल. तर आज उमेदवारी माघारीचा अखेरचा दिवस आहे. यामध्ये महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे सध्या अध्यक्ष असलेले विनोद कडू यांनी आपल्या उमेदवारी माघारीचा निर्णय जाहीर केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली : या शिक्षक मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी रोजी आचारसंहितेची सुरुवात झाली. इच्छुक उमेदवारांना 12 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरावा लागेल. 13 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जातील त्रुटी दुरुस्ती केल्या जातील आणि 16 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आज हा माघारीचा निर्णय सध्या अध्यक्ष असलेले विनोद कडू हे घेतील यासंदर्भात अनेक तर्क वितर्क आणि उलट चर्चा देखील सुरू आहेत, कारण भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र शिक्षण परिषद ही संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष असलेले विनोद कडू यांनी यामधून माघार घेतली.

विनोद कडू यांना मोठी आशा : शिक्षण परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू हे कोकण शिक्षक मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी पूर्ण तयारी देखील केली होती आणि महाराष्ट्र शिक्षण परिषदेने तीन वेळा या भागात आपला प्रतिनिधी दिलेला आहे. त्यामुळे विनोद कडू यांना मोठी आशा होती. कार्यकर्त्यांनी आणि इतर दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी त्या संदर्भात गेले सहा महिने कंबर कसून झपाट्याने जनतेमध्ये प्रचार देखील केला होता.

हेही वाचा : Nagpur Teacher constituency : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; गाणार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.