ETV Bharat / state

Maha Budget 2023 : राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी

author img

By

Published : Mar 9, 2023, 6:58 PM IST

राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांच्या देखभाल, जीर्णोद्धार आणि विकासासाठी भरीव तरतुद करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, आणि वैजनाथ महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1 हजार 700 पेक्षा जास्त तरतूद मुंबईच्या विकासासाठी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

MAHARASHTRA BUDGET 2023
MAHARASHTRA BUDGET 2023

मुंबई : राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांच्या देखभाल, जीर्णोद्धार आणि विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांच्या देखभाल, जीर्णोद्धार आणि विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि वैजनाथ ज्योतिर्लिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकारने 1 हजार 700 कोटींहून अधिक निधीची तरतूद केली आहे.

उमरी तीर्थक्षेत्र विकासाठी 500 कोटी : राज्य सरकाने धार्मिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्यच्या अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकासाठी राज्य सरकाने 500 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजुर केले आहेत. त्यामुळे धार्मिक विकासाचा चालना मिळणार आहे. तसचे धार्मिक स्थळांचा वारसा यातून जतन होणार आहे.

प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी धार्मिक स्थळासांठी विशेष आराखडा सादर केला आहे. राज्याती महत्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

ज्योतिबा प्राधीकरणला 50 कोटी : तसेच श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरणला 50 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी 25 कोटी रुपये, श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी देण्यात आला आहे.

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी 25 कोटी : प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधीची घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली आहे. गहिनीनाथ गडाच्या संवर्धन, विकासासाठी 25 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूरसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तसेच श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे, पुणे समाधीस्थळाला देखील 25 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा - Schools Uniforms Free : आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत; राज्य सरकारची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.