ETV Bharat / state

Breaking News Live : वृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना अटक, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Nov 13, 2022, 6:51 AM IST

Updated : Nov 13, 2022, 10:06 PM IST

Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking News

22:05 November 13

वृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना अटक, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा - मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अनिकेत राहुल वाडीकर (रा. सोमवार पेठ, कराड) आणि नागेश तायाप्पा गायकवाड (रा. मंगळवार पेठ, कराड), अशी संशयितांची नावे असून त्यांनी आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून साडे चार तोळ्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

21:45 November 13

मुंबईत गोवरची साथ; संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू, ७४० संशयित रुग्ण

मुंबई - मुंबईमध्ये झोपडपट्टी विभागात मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ९ लाख २६ हजार ४९२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ७४० संशयित रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत असल्याने या विभागात अतिरिक्त लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याठिकाणी केंद्र सरकारने नियुक्त केलेली ३ सदस्सीय टीम भेट देत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

20:30 November 13

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंधाधुंद गोळीबार

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीच्या वादातून (bullock cart race dispute Ambarnath Thane) दोन गटात अंधाधुंद गोळीबार (Gun firing between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अंधाधुंद गोळीबाराचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद (bullock cart race dispute Gun firing Video) झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. latest news from Thane, Thane Crime, Gun Firing In Bullock Cart Race

20:30 November 13

मुंबई विमानतळावर 32 कोटींचे सोने जप्त, अर्थमत्र्यांनी केले कामगिरीचे कौतुक

नवी दिल्ली - मुंबई विमानतळ कस्टम्सने 32 कोटी रुपये किमतीचे 61 किलो सोने जप्त केले आहे. (Gold Seize At Mumbai Airport). तसेच दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सात प्रवाशांना अटक केली आहे, असे एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. मुंबई विमानतळ कस्टम्सच्या (Mumbai Airport Customs) इतिहासातील एका दिवसातील ही सर्वाधिक जप्ती असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे.

20:00 November 13

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडेंची भेट

सांगली - दौऱ्यावर असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीमध्ये आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची घरी जाऊन भेट घेतली आहे,या भेटी दरम्यान बंद खोलीमध्ये भिडे आणि बावनकुळे यांची वीस मिनिटे चर्चा देखील झाली आहे. मात्र बंद दारा आड नेमकी काय चर्चा झाली या बाबतीत गुप्तता पाळण्यात आली आहे.

19:25 November 13

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, हेपेटायटिस, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यू, आदी आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यापैकी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या दोन वर्षात वाढ होताना दिसली आहे. कोरोनाचा प्रसार असताना जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत डेंग्यूचे १२९ रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत त्यात वाढ होऊन ८७६ रुग्णांची नोंद झाली. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यात डेंग्यूच्या ८४४ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील एका वर्षात जितक्या रुग्णांची नोंद झाली होती सुमारे तितक्याच रुग्णांची नोंद यंदा दहा महिन्यात झाली आहे.

19:25 November 13

मुंबईत १४ टक्के मृत्यू मधुमेहामुळे

मुंबई - चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने आरोग्य चाचणी आणि जनजागृती सारखे उपक्रम हाती घेतले आहेत अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.

19:24 November 13

मुंबईत आज कोरोनाचे ३० नवे रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. आज ३० नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १६३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन २५१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

18:47 November 13

नाराज आमदारांनी वाढवले मुख्यमंत्र्यांचे टेन्शन

मुंबई - पक्षातील नाराजी उफाळून आल्याने शिवसेनेत दोन गट तयार झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील नाराजीतूनच पक्षाविरोधात बंड पुकारला. आता याच नाराजीचा सामना मुख्यमंत्री शिंदे यांना करावा लागत आहे. शिंदे गटात आमदार नाराज असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे टेन्शन वाढवले आहे.

18:20 November 13

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत छत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरण करेल त्याविरोधात उभा राहणार - जितेंद्र आव्हाड

ठाणे - हर हर महादेव चित्रपट पाहिला गेलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर ठाणे जिल्हा न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतर ही जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखवलेला इतिहास चुकीचा असल्याचं सांगितलं होतं. त्यावर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीचा दाखवणाऱ्यांच्या विरोधात आपण लढत राहू असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सध्या काही लोक विकृतीकरण करत आहे. या विकृतीकरणाच्या विरोधात आपण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नेहमीच उभे राहू असंही ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे.

17:39 November 13

मुंबईतील महिलांमध्ये रक्तक्षय, उच्च रक्तदाब, डायबेटिकचे आजार

मुंबई: 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान राज्यभरात राबवले जात आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने 26 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत 18 वर्षावरील 2 लाख 90 हजार 83 लाभार्थी महिलांची तपासणी केली. त्यातील 2 लाख 82 हजार 919 लाभार्थ्यांची ब्लडप्रेशरची तपासणी केली असता, त्यात 8158 लाभार्थ्यांना रक्तदाब झाल्याचे निदान झाले आहे. 2 लाख 71 हजार 991 लाभार्थ्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.

17:39 November 13

कीर्तिकरांचे पुत्र राऊतांच्या भेटीला

मुंबई : उद्धव ठाकरेंचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. गजानन कीर्तिकारांच्या जाण्याने पक्षाला कोणताही फार मोठा परिणाम होणार नाही. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शनिवारी दिली. त्यानंतर लगेचच आज गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी (Gajanan Kirtikar son Amol Kirtikar) संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले. तर, फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे असतो, असा खोचक टोला देखील त्यांनी (Amol Kirtikar met to Sanjay Raut)लगावला.

17:38 November 13

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हायजॅक, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

सांगली - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) यात्रेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) काढत आहेत तर, दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत जोडो यात्रेवर टीका ( BJP criticizes Bharat Jodo Yatra ) करताना ते म्हणाले विरोधकांनी भारत जोडो हायजॅक यात्रा केली आहे.

17:38 November 13

तरुण, शेतकरी समस्या राहुल गांधींना सांगतायेत, ते सरकारवर नाराज - नाना पटोले

नांदेड - लोकांना बेरोजगारी आणि शेतकरी समस्यांबद्दल माहिती आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान तरुण, शेतकरी आणि इतर राज्यातील लोक आपल्या समस्या सांगत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ते सध्याच्या सरकारवर नाराज असल्याचे कळते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये दिली.

17:17 November 13

इंग्लंडने जिंकला टी-20 विश्वचषक; पाकिस्तानचा पराभव

अटीतटीच्या लढतीत इंग्लंडचा विजय झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे.

17:01 November 13

जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न - अजित पवार

बारामती : जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रातील वडीलधाऱ्या नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करणे शिकवले नाही. कोणत्याच पक्षाच्या नेत्याकडून तसेच प्रवक्त्याकडून, पक्षप्रमुखांकडून अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त (Opposition Leader Ajit Pawar) केले.

17:01 November 13

दीड कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण, फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सुरतवरून सुटका

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतून दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका १२ वर्षाच्या शाळकरी मुलाचे सुरत (गुजरात) येथून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात मानपाडा पोलिसांना शनिवारी यश आले. खळबळजनक बाब म्हणजे अपहरणाचा मास्टरमाईंड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दुहेरी हत्याकांडसह अनेक गंभीर दाखल आहे. तर या गुन्ह्यात त्याच्या बायको, बहिणीसह प्रेयसी आणि मेहुण्याच्या सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांनाही बेड्या ठोकल्या आहे. फरदशहा फिरोजशहा रफाई, मुख्य आरोपी (२६, पालघर, मूळ निवासी गुजरात, राजकोट), प्रिंसकुमार रामनगिना सिंग (२४, भावनगर, गुजरात, मेहुणा ), शाहीन शाबम मेहतर (२७, राजकोट, मुख्य आरोपीची प्रेयसी ), फरहीन प्रिंसकुमार सिंग (२०, फरदशहाची. बहीण), नाझिया फरदशहा रफाई (२५, पत्नी). असे अटक आरोपींची नावे आहेत.

15:59 November 13

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर पकडले 61 किलो सोने, किंमत आहे 32 करोड

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर 61 किलो सोने पकडले आहे. याची किंमत 32 करोड आहे.

15:28 November 13

गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच! तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही - संजय निरुपम

मुंबई - खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. तसंच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निरुपम बोलत होते.

14:51 November 13

रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट

लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट

डिवाइन कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट

स्फोटामध्ये पाच कामगार भाजल्याची माहिती

कामगारांना चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये हलवलं

14:12 November 13

शिंदे फडणवीस सरकार फार तर चार ते सहा महिने टिकेल-सुषमा अंधारे

शिंदे गटात गेलेले अनेकजण आमच्याकडे येतील. शिंदे फडणवीस सरकार फार तर चार ते सहा महिने टिकेल, असा दावा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

13:45 November 13

दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण, ५ सराईत गुन्हेगारांना अटक

दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मानपाडासह २० पोलीस पथकाच्या अथक प्रयत्नानांतर मुलाची सुखरूप सुटका केली आहे. आरोपीमध्ये नवारा बायकोसह गर्लफ्रेंडचाही सहभाग आहे.

13:03 November 13

इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय

इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध टी २० मध्ये अंतिम सामना सुरू आहे. इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

12:33 November 13

अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघातात मृत्यू

तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. कल्याणीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता.कल्याणीने काही दिवसांपूर्वीच 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

11:57 November 13

महाराष्ट्रातील प्रकल्प कोण ओरबडतय यावर चर्चा करा, संजय राऊत यांची मागणी

अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकरांच्या निर्णयात सहभाग नाहीत. महाराष्ट्र आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून देशाच्या नकाशावरून पुसण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्प कोण ओरबडतय यावर चर्चा करा, अशी मागणी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

11:47 November 13

25 वर्षीय खलाशाची सर्व्हिस रायफलचा वापर करून आत्महत्या

भारतीय नौदलाच्या एका 25 वर्षीय खलाशाने सर्व्हिस रायफलचा वापर करून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अपघाती मृत्यूची नोंद झाली असून चौकशी सुरू आहे. भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले आहे.

10:58 November 13

पालघर जिल्हा परिषदेची लढाई ही दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल-भास्कर जाधव

विरार- पालघर जिल्हा परिषदेची लढाई ही दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल. ज्यांना कुणाला धमक्या, बळजबरी किंवा गुन्हे दाखल करायचे ते करू द्या. वेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा एल्गार शिवसेना नेते आणि प्रवक्ते भास्करराव जाधव यांनी दिला.

09:44 November 13

दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश लांबला...

दिपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा शिंदे गटातील आजचा प्रवेश पुढे ढकलला आहे.

09:14 November 13

बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला स्थळ आले. पसंती झाली. पण हुंडा देण्या-घेण्यावरून लग्न मोडले. मात्र, लग्न मोडल्यावरही तरुणाने मुलीचा पिच्छा सोडला नाही. शिक्षणासाठी बीडमध्ये शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या 16 वर्षीय पीडितेला, वसतिगृहातून दुचाकीवरून बाहेर लॉजवर नेऊन दोनवेळा त्याने कुकर्म केले. तिसऱ्यांदा गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एका शेतात नेले व बळजबरी केली. मुलीने आधी लग्न करू, असे सांगितल्यावर शिवीगाळ करत तिला एकटीला सोडून त्याने पलायन केले.

08:08 November 13

डॅलसमधील एअर शो दरम्यान दोन विमानांची धडक

डॅलसमधील एअर शो दरम्यान शनिवारी दोन ऐतिहासिक लष्करी विमाने एकमेकांवर आदळली आणि जमिनीवर कोसळली, ज्वालांच्या बॉलमध्ये स्फोट झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. विमानात किती लोक होते किंवा जमिनीवर कोणाला दुखापत झाली हे स्पष्ट झाले नाही.

07:48 November 13

कालवा समितीची शिंदे फडवणीस सरकारकडून पुनर्रचना

पुणे: धरणातील पाणी वाटपाचे नियोजन करणारी ,चालू हंगामात पाण्याचे नियोजन करणारी महत्त्वाची समिती म्हणजे कालवा समिती असते. त्या कालवा समितीची आता शिंदे फडवणीस सरकारने पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यापुढे कालवा समितीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष हे त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना करण्याचा निर्णय फडणवीस शिंदे फडवणीस सरकारने घेतला आहे.

07:21 November 13

निवडणूक आयोग आता भाजपची शाखा -मेहबुबा मुफ्ती

निवडणूक आयोग आता भाजपची शाखा आहे. त्यांच्या संकेतांवर निवडणुका घेण्यात येतात, असा आरोप पीडीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आरोप केला.

06:59 November 13

अनंतनाग येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन परप्रांतीय मजूर जखमी

अनंतनाग येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन परप्रांतीय मजूर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अनंत नाग जिल्ह्यातील राख मोमीन भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मजूर जखमी झाले आहेत.

गोरखपूर यूपीचा छोटा प्रसाद आणि गोंड अशी जखमी मजुरांची नावे आहेत.

06:56 November 13

एम्सचे दिल्लीचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची स्वेच्छानिवृत्ती

एम्सचे दिल्लीचे माजी संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कोरोनाकाळात त्यांनी जनजागृतीबरोबरच जनतेला महत्त्वाची माहिती देऊन अलर्ट ठेवण्याची मोलाची कामगिरी बजाविली आहे.

06:54 November 13

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील चार दोषींची कारागृहातून सुटका

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील चार दोषी त्रिची येथील विशेष शिबिरात पोहोचले. दोषी रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांची पुझल मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. तर मुरुगन आणि संथन यांची वेल्लोर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

06:54 November 13

द टर्मिनलची प्रेरणा असलेल्या निर्वासित मेहरान करीमी यांचे निधन

स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'द टर्मिनल'ला प्रेरणा देणारे इराणी निर्वासित मेहरान करीमी नसेरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

06:24 November 13

Maharashtra Breaking News शिंदे फडणवीस सरकार फार तर चार ते सहा महिने टिकेल-सुषमा अंधारे

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच काही पोलीस अधिकारी वर्गाच्या बदल्या केल्या आहेत. एमपीएसी आणि इतर परीक्षा घोटाळा बाहेर काढणाऱ्या आयपीएस भाग्यश्री नवटके यांना महाराष्ट्र शासनाने साईड पोस्टिंग दिली. साईड पोस्टिंग देत चंद्रपुरात त्यांची बदली केली गेली. त्यामुळे विद्यार्थी आणि विदयार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Last Updated :Nov 13, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.