ETV Bharat / state

मध्य प्रदेशातून सिमीचा कार्यकर्ता अटक; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

author img

By

Published : Dec 13, 2019, 8:27 AM IST

सिमी या दहशतवादी संघटनेचा सभासद असलेल्या एजाज अक्रम याला अटक करण्यात आली. मध्य प्रदेशमधील सत्र न्यायालयातून एजाज अक्रम याची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला महाराष्ट्रात आणले जाईल.

सिमीचा कार्यकर्ता अटक
सिमीचा कार्यकर्ता अटक

मुंबई - बंदी घालण्यात आलेल्या 'स्टूडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया'( सिमी) या दहशतवादी संघटनेचा सभासद असलेल्या एजाज अक्रम (वय-40) याला अटक करण्यात आली. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मध्यप्रदेश पोलिसांच्या सहाय्याने बुऱ्हाणपूर येथे ही कारवाई केली.


मध्य प्रदेशमधील सत्र न्यायालयातून एजाज अक्रम याची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला महाराष्ट्रात आणले जाईल. महाराष्ट्रात 2006 मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात इजाज अक्रम हा सुद्धा सहभागी होता. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एटीएस त्याच्या शोधात होते. तो बुऱ्हाणपूर येथे असल्याची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलिसांच्या सहाय्याने महाराष्ट्र एटीएसने त्याला अटक केली. अक्रमकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे सिमी ?
'स्टूडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया'ची स्थापना 25 एप्रिल 1977मध्ये उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे करण्यात आलेली होती. या संघटनेच्या दहशतवादी कारवाया समोर आल्यानंतर 2002 मध्ये केंद्र सरकारकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, 2008 मध्ये विशेष सत्र न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणीनंतर या संघटनेवरील बंदी उठवण्यात आली. ऑगस्ट 2008 मध्येच पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून सीमीवर बंदी घालण्यात आली. अन लॉफुल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन एक्ट 1967 नुसार सिमीवर बंदी आहे. एटीएसच्या माहितीनुसार सिमीचे दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात जाळे निर्माण झाले होते. मात्र केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर इंडियन मुजाहिद्दीन या नावाने सध्या सीमी कार्यरत असल्याचा संशय आहे.

Intro:बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टुडंट मोमेंट ऑफ इंडिया ( सिमी) या दहशतवादी संघटनेचा सभासद असलेल्या इजाज अक्रम (40) याला महाराष्ट्र एटीएसने मध्यप्रदेश पोलिसांच्या साहाय्याने मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर येथून अटक केलेली आहे.

मध्य प्रदेश मधील सत्र न्यायालय मधून एजाज अकरम याची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला महाराष्ट्र एटीएस कडून मुंबईचा आणले जात आहे. महाराष्ट्रात 2006 साली सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी इजाज अक्रम हा सुद्धा शामिल होता. महाराष्ट्र एटीएस अधिकारी त्याच्या शोधामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते मात्र तो मध्यप्रदेश मधील बुऱ्हाणपूर येथे असल्याचं कळत आज मध्य प्रदेश पोलिसांनी च्या सहाय्याने महाराष्ट्र एटीएस ने त्यास अटक केली आहे. इजाज अक्रम याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडल्याचे एटीएस च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. Body:काय आहे सिमी


स्टुडेंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाची स्थापना 25 एप्रिल 1977 रोजी उत्तर प्रदेश मधील अलिगड येथे करण्यात आलेली होती. या संघटनेच्या आतंकवादी कारवाया समोर आल्यानंतर , 2002 मध्ये केंद्र सरकारकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली होती. मात्र 2008 मध्ये विशेष सत्र न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी होत या संघटनेवरील बंदी उठवण्यात आले होती. मात्र ऑगस्ट 2008 साली पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून सीमी वर बंदी घालण्यात आली आहे . अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन एक्ट 1967 नुसार सिमी वर बंदी घालण्यात आली आहे. एटीएस सुत्रांच्या माहितीनुसार सिमीच दिल्ली, उत्तर प्रदेश मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात चांगले जाळे निर्माण झाले होते. मात्र केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर इंडियन मुजाहिद्दीन या नावाने सध्या सीमी कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.