ETV Bharat / state

Breaking News : उझबेकिस्तानमध्ये कथित कफसिरप घेतल्याने मुलांच्या मृत्यू प्रकरणी भारत सरकारचे चौकशीचे आदेश

author img

By

Published : Dec 29, 2022, 7:21 AM IST

Updated : Dec 29, 2022, 7:54 PM IST

breaking News
ब्रेकिंग न्यूज

19:25 December 29

उझबेकिस्तानमध्ये कथित कफसिरप घेतल्याने मुलांच्या मृत्यू प्रकरणी भारत सरकारचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली - उझबेकिस्तानमध्ये बनावटीचे कफसिरप घेतल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तावर भारताने सहकार्याची भूमिक घेतली आहे. भारतीय दूतावासाने यासंदर्भात सर्व यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारत सरकारने संबंधित कंपनीच्या उत्पादनांच्या तपासणीसह चौकशीचे आदेश दिले आहेत.

18:59 December 29

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई - विधान परिषद जागा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक (पदवीधर), अमरावती (पदवीधर), नागपूर (पदवीधर), औरंगाबाद (शिक्षक), कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०२३ आहे. मतदान ३० जानेवारीला होईल. तसेच निकाल २ फेब्रुवारी 2023 रोजी होईल.

18:56 December 29

नाशिक ते औरंगाबाद नव्याने विद्युतीकरण केलेल्या रेल्वे मार्गाची चाचणी

औरंगाबाद - नव्याने विद्युतीकृत अंकाई ते औरंगाबाद रेल्वे मार्गावरील ट्रेनच्या चाचण्या सुरू होणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन या मार्गावर धावेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

18:28 December 29

तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांचे जबाब पोलिसांनी नोंदवले

पालघर - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी वसई येथील वालीव पोलिसांकडून तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी आज तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा आणि तुनिषाच्या आईचे जबाब नोंदवले. तर पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करू द्या, त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येईल असे तिच्या काकांनी स्पष्ट केले.

17:41 December 29

तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणी शीझान खानला दोष देऊ शकत नाही - उर्फी जावेद

मुंबई - बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदने तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी शीझान खानच्या समर्थनार्थ आपले मत मांडले. इंस्टाग्रामवर उर्फीने तिने एक पोस्ट शेअर करुन आपले मत व्यक्त केले आहे. तुनिषाचे आणि त्याचे पटत नसेल. त्यांचा ब्रेक अप झाला असेल. मात्र यामुळे तिच्या मृत्यूला त्याला जबाबदार धरणे योग्य होणार नाही अशा आशयाची ही पोस्ट तिने इन्स्टाग्रामला टाकली आहे.

17:16 December 29

सुभाष देसाई यांच्या भूखंड घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी - सामंत

नागपूर - माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या भूखंड घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याची विधानसभेत घोषणा केली.

17:13 December 29

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करणार - मुख्यमत्र्यांची घोषणा

नागपूर - राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या स्थापनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन या परिषदेचे अध्यक्ष असतील अशी घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

16:37 December 29

सुधारित ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाने बुधवारी ब्रह्मोस या हवेतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र सुमारे 400 किमी अंतरावरील लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. Su-30 लढाऊ विमानातून प्रक्षेपित केल्यानंतर क्षेपणास्त्राने लक्ष्य जहाजावर अचूक मारा केला.

16:20 December 29

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

नागपूर - औरंगाबादमध्ये मोसंबी आणि संत्रा पिकांसाठी नऊ कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत 18 प्रकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत आहोत असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे समुपदेशन मदत आणि तज्ञांच्यामार्फत मार्गदर्शन दिले जाणार असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

16:17 December 29

सलीम फ्रुटचा मकोका कोर्टात डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज

मुंबई - खंडणी वसुली प्रकरणात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटचा मुंबई सत्र न्यायालयात विशेष मकोका कोर्टात डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज. व्यवसायिकाकडून खंडणी वसुली प्रकरणात मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला होता. खंडणी विरोधी पथकाकडून दाखल करण्यात आलेले आरोप पत्र अपूर्ण असल्याने डिफॉल्ट जामीनासाठी त्याने अर्ज केला आहे.

15:58 December 29

हिरकणी कक्षाअभावी 68 टक्के मातांची कुचंबणा, भाजप आमदारांचा संताप

नागपूर - हिरकणी कक्षाअभावी 68 टक्के मातांना कार, बस, शौचालय अशा सार्वजनिक ठिकाणी मातृत्वाची जबाबदारी बजवावी लागत असल्याची माहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषदेत दिली. सभागृहात सरकारच्या गलथान कारभाराचा पाढाच या भाजप आमदारांनी वाचला. राज्य शासनाने तात्काळ दखल घेण्याची त्यांनी मागणी केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला.

15:57 December 29

सीतारामन यांना एम्समधून डिस्चार्ज

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना पोटात इन्फेक्शन झाल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

15:52 December 29

1 जानेवारीपासून चीन हाँगकाँगसह सात देशातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर अनिवार्य

नव दिल्ली - 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना प्रवासापूर्वी त्यांचे अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावे लागतील, तरच त्यांना देशात प्रवेश दिला जाईल असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केले आहे.

15:33 December 29

गडकिल्ले संरक्षित स्मारके यासाठी 3 टक्के निधीची विधिमंडळाची मान्यता

नागपूर - संभाजी महाराजांचे स्मारक तयार करण्याबाबत आढावा घेतला. अतिशय चांगले स्मारक करू अशी ग्वाही विधिमंडळात देण्यात आली. तीन टक्के निधीची मान्यता राज्यातील गडकिल्ले संरक्षित स्मारके यासाठी करणार असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

15:29 December 29

विदर्भात 69 तर मराठवाड्यात 17 सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

नागपूर - विदर्भात 69 तर मराठवाड्यात 17 सिंचन प्रकल्प मार्गी लावणार असे आज उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय सिंचन प्रकल्प योजनेअंतर्गत महाराष्ट्रात विदर्भात एक लाख 66 हजार 945 हेक्टर क्षेत्र मराठवाड्यात 43 हजार 236 हेक्टर क्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्रात एक लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

15:07 December 29

नागपूर अधिवेशन - चाळीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य

नागपूर - देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन करुन चाळीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीसाठी 3200 कोटी, एमएसआरटीसी साठी एक हजार कोटी, कृषी पंप यंत्रमाग वस्त्रोउद्योग औद्योगिक ग्राहक सबसिडी प्रयोजनासाठी पाच हजार कोटी अशा मागण्यांना मंजूरी देण्यात आली. भांडवली गुंतवणूकीसाठी निधी राखीव म्हणून चार हजार कोटींची ठोक तरतूद करण्यात आली.

15:05 December 29

अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा 'रोका' सोहळा उत्साहात

राजसमंद - राजस्थानमधील नाथद्वारमध्ये अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा 'रोका' सोहळा पार पडला. नाथद्वार येथील श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडला. दोघांचे लवकरच लग्न होणार आहे.

14:37 December 29

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे बीएमसीत आंदोलन

मुंबई - शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी (उद्धव ठाकरे गट) मुंबईतील बीएमसी इमारतीतील शिवसेना कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले.

14:12 December 29

अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला-उद्धव ठाकरे

भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील असे वाटत नाही. गेल्या सहा महिन्यामध्ये सरकार काय करते हे समोर आले आहे. विदर्भाला काय देणार याकडे सरकारकडे उत्तर नाही.

13:52 December 29

गायरान जमीन वाटप प्रकरणी सत्तारांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्या - अजित पवार

नागपूर - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदावर असताना गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा. चौकशी होईपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

12:58 December 29

कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई - कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांना विशेष सीबीआय कोर्टात हजर केले होते. तिन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्याची सीबीआयची कोर्टासमोर विनंती करण्यात आली. कोर्टाने तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत दिली.

12:53 December 29

चित्रपट निर्माते नितीन मनमोहन देसाई यांचे निधन

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन देसाई यांचे २९ डिसेंबर रोजी मुंबईत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. नितीन देसाई हॉस्पिटलमध्ये आणि जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होते. 3 डिसेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

12:39 December 29

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या घरच्यांची रामदास आठवलेंनी घेतली भेट

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

12:19 December 29

विरोधक खोके आणि बोके घेऊन विधानसभेत दाखल

नागपूर - विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीने आज अनोखी निदर्शने केली. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणेनंतर आज विरोधक प्रत्यक्षात खोके आणि बोके घेऊन विधानसभेत दाखल झाले आहेत. यावेळी विरोधकांनी शेतकरी हैराण सत्तार खातो गायरानच्या घोषणा देत खोकेवाल्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.

12:16 December 29

जालना शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; 10 जण गंभीर जखमी

जालना - शहरातील वाल्मीक नगर येथे 28 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वावर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाल्मीक नगर येथे शेजारीच राहणार्‍या दोन कुटुंबात ही हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील लोक जखमी आहेत. एका गटातील 7 जखमी आहेत. या जखमींमध्ये मध्ये 3 महिलांचाही समावेश आहे.

12:06 December 29

कोचर दांपत्यासह धूत यांना घेऊन सीबीआय मुंबई सत्र न्यायालयात

मुंबई - कोचर दांपत्यासह धूत यांना घेऊन सीबीआय मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर, माजी सीईओ दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष सीबीआय कोर्टात आज पुन्हा हजर करणात आले. कोर्टाने दिलेली 2 दिवसांची सीबीआय कोठडी आज संपत आहे.

11:38 December 29

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हेडगेवार आणि गोळवलकर यांना वाहिली आदरांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक स्मृती मंदिरात संस्थापक केबी हेडगेवार आणि एम एस गोळवलकर यांना आदरांजली वाहिली.

11:35 December 29

राज्याबाहेर असतानाही मतदान करता येणार, निवडणूक आयोगाकडून रिमोट मतदानाची चाचणी

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) प्रोटोटाइप मल्टी-कॉन्स्टिट्यून्सी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) विकसित केले आहे. जे एकाच रिमोट मतदान केंद्रावरून अनेक मतदारसंघ हाताळू शकते. त्यामुळे, स्थलांतरित मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याची गरज नसल्याचे भारत निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

11:16 December 29

बीएमसीमधील कार्यालय घेणे म्हणजे सत्तेचा गैरवापर नाही- शंभुराज देसाई

बीएमसीमधील कार्यालय घेणे म्हणजे सत्तेचा गैरवापर नाही. आमचे बहुतांश अधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहेत. ज्या पद्धतीने आम्हाला विधीमंडळ कार्यालय मिळाले, त्याचप्रमाणे मुंबई महानगर पालिका कार्यालय आमचे आहे आणि आमचे कार्यकर्ते तेथून काम करू शकतात, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

10:38 December 29

आपण 2047 पर्यंत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो-मुकेश अंबानी

टंचाई, टंचाई आणि व्यापक गरिबीच्या युगातून, भारत सर्वसमावेशक समृद्धी, विपुल संधी आणि 1.4 अब्ज भारतीयांच्या राहणीमान आणि जीवनाच्या दर्जामध्ये अकल्पनीय सुधारणांच्या युगात प्रवेश करेल. आपण 2047 पर्यंत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो. आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी, शाश्वत आणि स्थिर पद्धतीने करणार आहोत. हे उद्दिष्ट वास्तववादी आणि साध्य करण्यायोग्य आहे. कारण भारताला तरुण लोकसंख्या, परिपक्व लोकशाही आणि तंत्रज्ञानाच्या नव्या सामर्थ्याचा आशीर्वाद आहे असे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स फॅमिली डे फंक्शन 2022 मध्ये म्हटले आहे.

10:34 December 29

शिंदे गट घुसखोर आहे, मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय हे आमच्या ताब्यात राहणार-संजय राऊत

शिंदे गट घुसखोर आहे. गद्दार कुठेही घुसतात. मात्र शिवसेनेचे महापालिकेत बहुमत आहेत. ठोकशाहीत आमच्याशी स्पर्धा करू नये. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय हे आमच्या ताब्यात राहणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

10:08 December 29

महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा-अजित पवार

महापुरुषांच्या अवमानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. विदर्भाचे प्रश्न मांडणे गरजेचे होते. महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होणार आहे.

09:39 December 29

संजय राऊतांना वेड्यांच्या इस्पितळात न्या-आमदार नितेश राणे

संजय राऊतांना वेड्यांच्या इस्पितळात न्या. त्यांचा वरचा मजला सटकला आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाबाहेर केली.

09:12 December 29

बिहार सरकारकडून हेलिकॉप्टर आणि जेट विमान खरेदीचा निर्णय, भाजपचा विरोध

हेलिकॉप्टर आणि जेट विमान खरेदीला राज्य सरकारची मान्यता योग्य नाही. आता, राज्य सरकारे ते विकत घेत नाहीत त्याऐवजी ते भाडेतत्त्वावर घेतले जातात. तेजस्वी यादव यांना वाटते की ते पुढे मुख्यमंत्री होतील, म्हणूनच जेट विमान आणि हेलिकॉप्टर त्यांच्या दबावाखाली आणले गेल्याचा आरोप भाजप नेते सुशील मोदी यांनी केला.

08:49 December 29

गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त सुवर्ण मंदिरात भाविकांची प्रार्थना

गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांनी प्रार्थना करण्यासाठी गर्दी केली आहे.

08:07 December 29

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अभिनेत्रीची आई, काका आणि ड्रायव्हरचा पोलीस नोंदविणार जबाब

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अभिनेत्रीची आई, काका आणि ड्रायव्हर यांचा पोलीस जबाब नोंदवणार आहेत.

07:38 December 29

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळली, उपजिल्हाधिकाऱ्याला अटक

उपजिल्हाधिकारी, जगतसिंगपूर चित्त रंजन पिल्ला यांना ओडिशा दक्षताने त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 191% जास्त संपत्ती (DA) ठेवल्याबद्दल अटक केली.

06:36 December 29

Breaking News : विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस, विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यावर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाचे नेते विविध मुद्द्यावर आज आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Dec 29, 2022, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.