ETV Bharat / state

हायप्रोफाईल आरोपी असलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचा आता मुंबई गुन्हे शाखा करणार तपास

author img

By ANI

Published : Nov 23, 2023, 8:35 AM IST

Updated : Nov 23, 2023, 9:02 AM IST

Mahadev betting app case महादेव अ‍ॅप बेटिंग तपास आता माटुंगा पोलीस स्टेशनवरून मुंबई गुन्हे वर्गाकडं देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी सखोल तपास होणार आहे.

Mahadev betting app
Mahadev betting app

मुंबई Mahadev betting app case: 15,000 कोटी रुपयांच्या महादेव सट्टेबाजी अ‍ॅप घोटाळ्याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याआधी 14 नोव्हेंबर रोजी डाबरचे संचालक गौरव बर्मन आणि कंपनीचे अध्यक्ष मोहित यांच्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल केला. माटुंगा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्यासह 30 हून अधिक संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यावर फसवणूक आणि जुगार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा सामाजिक कार्यकर्ते बनकर यांनी दावा केला. तसेच आरोपींना हवाला व्यवहारातून पैसे मिळाल्याचाही आरोप केला आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अभिनेता आणि उद्योगपतीदेखील रडारवर आल्यानं हे प्रकरण हायप्रोफाईल झाले. हवाल्यातून पैशांचे व्यवहार झाल्याचा आरोप असल्यानं ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

आजपर्यंत काय घडले?

  • सध्या छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महादेव बेटिंगनं राजकारणात खळबळ उडविली आहे. याच घोटाळ्यात कथित सहभागावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला. मात्र मुख्यमंत्री बघेल यांनी घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
  • पोलिसांनी बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
  • एफआयआरमध्ये मुंबईस्थित आरोपी मोहित बर्मन, दिनेश खंभाट, रोहित कुमार, मुर्गाई आणि गौरव बर्मन यांच्यात संबंध असल्याचं समोर आले.

काय आहे आरोप- आरोपींनी क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणाऱ्या कंपनीमध्ये शेअरची खरेदी केली. लीगमधील क्रिकेट सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंगच्या गुन्हेगारीत गुंतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मोहित हे डाबर इंडिया लिमिटेडचे चेअरमन आहेत. त्यांचेही एफआयरमध्ये नाव आहे. एफआयआरमध्ये असेही नमूद केलं आहे, की आरोपी सौरभ चंद्राकरचा अनेक प्रभावशाली व्यक्तींशी आणि काँग्रेस नेत्यांशी संबंधित आहेत. चंद्राकर यांनी मॅच फिक्सिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप आहे.

हेही वाचा-

  1. Mahadev App Case: महादेव ॲप प्रकरण: खिलाडी ॲप संदर्भात 15 हजार कोटींच्या फसवणुकीचा तपास EOW कडे वर्ग करणार
  2. Mahadev Book App Scam : महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसात पहिला गुन्हा; 15,000 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  3. Illegal Betting App Ban : महादेव अ‍ॅपसह सट्टेबाजीचे 22 अ‍ॅप मोदी सरकारकडून 'क्लिन बोल्ड', काय आहे कारण?
Last Updated :Nov 23, 2023, 9:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.