ETV Bharat / state

लोकसभेत मोदींचा जलवा की राहुल गांधींची चालेल जादू?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 10:04 PM IST

Mumbai News
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

Loksabha Election २०२४ : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) एप्रिल किंवा मे 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. अजून या निवडणुकीसाठी चार पाच महिन्याचा अवधी आहे. मात्र आतापासूनच 2024 चा पंतप्रधान कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राहुल गांधी (Rahul Gandhi) की, अन्य कोण? यावर चर्चा होऊ लागल्या आहेत. याबाबत सामान्य लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया

मुंबई Loksabha Election २०२४ : देशात लोकसभा निवडणूक (Loksabha Election) या वर्षी होणार आहे. त्याची तयारी आणि रणनीती मागील कित्येक महिन्यांपासून राजकीय पक्षांकडून सुरु आहे. 2019 साली एप्रिल-मे महिन्यात पाच वर्षापूर्वी लोकसभा निडणूक पार पडली होती. त्यामुळं पाच वर्षाचा लोकसभा निवडणुकीचा एप्रिल-मे महिन्यात कार्यकाळ पूर्ण होत आहे. दरम्यान, आता देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, सध्या जागावाटपाची गणित आणि समीकरण सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना रंगणार आहे. यामुळं 2024 या वर्षात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? आणि 2024 ला पंतप्रधान कोण होणार? याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.



मोदी हट्रीक करणार? : 2014 आणि 2019 साली देशात भाजपाचे सरकार आले. या दोन्ही वेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विराजमान झाले. यामुळं तिसऱ्यांदा भाजपाचीच सत्ता येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील. कारण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. गरिबांसाठी मोदींनी महत्वाच्या योजना आणल्या तसेच खासकरुन महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या त्याच्या फायदा आमच्यासारख्या महिलांना होतोय, असं मुंबईतील महिलांनी म्हटलं आहे. याचा सर्व फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार का? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालेल का? भाजपाची पुन्हा सत्ता येईल का? आणि मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन, पंतप्रधानपदाची हट्रीक करतील का?, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.



काँग्रेसची सत्ता येणार? : दुसरीकडे देशात जेव्हापासून भाजपाची सत्ता आली आहे, तेव्हापासून देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. अनेक जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य लोकांचे जगणं कठीण होऊन बसलं आहे. वाढत्या महागाईमुळं जगायचे कसं? हा खरा प्रश्न आमच्यासमोर आहे. असा संतप्त नाराजीचा सूर मोदी आणि भाजपाबद्दल लोकांच्यात दिसून आला. पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, तर यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, काँग्रेसची सत्ता येईल, असं देखील सामान्य लोकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस
  2. लोकसभा निवडणूक २०२४ : पुढील पंधरा दिवसात महाविकास आघाडीत कोण कुठून लढणार ते स्पष्ट होईल - सुप्रिया सुळे
  3. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रामदास आठवलेंची मोठी मागणी, आरपीआयसाठी मागितल्या 'इतक्या' जागा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.