ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रामदास आठवलेंची मोठी मागणी, आरपीआयसाठी मागितल्या 'इतक्या' जागा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 2:06 PM IST

Updated : Jan 1, 2024, 2:38 PM IST

Ramdas Athawale on Loksabha Election : लोकसभा निवडणुकीवरुन सध्या प्रत्येक राजकीय पक्ष सध्या तयारी करत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या पक्षाला किती जागा हव्यात, यावरुन मोठं वक्तव्य केलंय.

Ramdas Athawale on Loksabha Election
Ramdas Athawale on Loksabha Election

पुणे Ramdas Athawale on Loksabha Election : देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडी आहे. तर विरोधकांनी 'इंडिया' आघाडी केलीय. एनडीएमध्ये असलेले रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी केलीय. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देत अभिवादन केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले आठवले : यावेळी बोलताना आठवले यांनी दलितांच्या तसंच बहुजनांच्या मतांसाठी त्यांच्या पक्षाला जागा देण्याची मागणी केली. शिर्डी आणि विदर्भातून एक अशा जागांची मागणी करत त्यांनी आपण स्वतः शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही त्यांनी माहिती दिली. चिन्ह मिळालं तर त्यांच्या हक्काच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा आठवले यांनी केला. शौर्य दिनाच्या या युद्धात ज्यांनी बलिदान दिलं, त्या हुतात्म्यांनाही त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली.

"ज्या पद्धतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करायला शिकवलंय, त्याच पद्धतीनं लढा देण्याचं संकल्प आम्ही करत आहोत. बाबासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढा द्यायचं शिकवलंय. हे नवीन वर्ष देशासाठी तसंच दलितांच्या साठी खूप महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400 च्या पुढं जागा जिंकायच्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मजबूत करायचंय, असा संकल्प या नवीन वर्षात करत आहोत."- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

'इंडिया' आघाडी आमच्यावर वरचढ होणार नाही : एनडीएमध्ये निमंत्रकपदावरुन सुरू असलेल्या वादावर आठवलेंना विचारलं असता त्यांनी जागावाटपाबद्दल कोणताही वाद नसल्याचा दावा केला. "जो वाद असेल तो आम्ही मिटवणार आहोत. विरोधकांची 'इंडिया' आघाडी आमच्यावर वरचढ होणार नाही. 'इंडिया'च्या नावानं जी आघाडी सुरु करण्यात आलीय, ती फक्त मोदी यांना हटवण्यासाठीच तयार करण्यात आलेली आहे. ती आघाडी देशाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेली नाही. आज जनता आमच्या पाठीशी आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकणार आहोत," असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस
  2. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
Last Updated :Jan 1, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.