ETV Bharat / state

Live In Relationship : लिव्हइन रिलेशनशिप योग्य की अयोग्य? कायदा काय म्हणतो?

author img

By

Published : Nov 16, 2022, 10:05 PM IST

सामाजिक स्तरावर, लिव्हइन मान्यता ( Live In Relationship ) असो वा नसो, भारतात याबाबत अनेक कायदेशीर अधिकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय कायदा लिव्हइन हा गुन्हा (Indian law criminalize live in relationships ) मानत नाही. एखादं अविवाहित असलेलं जोडपं तरुण तरुणी किंवा कोणतेही दोन लोक परस्पर संमतीने एकत्र राहू शकतात. भारतीय कायद्यात ते पूर्णपणे कायदेशीर ( Live in relationship legal in India ) आहे. भारतीय कायदा याला बेकायदेशीर मानत नाही.

Live In Relationship
Live In Relationship

मुंबई - मुंबईत राहणाऱ्या आफताब पूनावाला ( Aftab Poonawala ) याने आपल्याच मैत्रिणी श्रद्धाची दिल्लीत नेऊन हत्या ( Shraddha murder case ) करून तिचे 35 तुकडे केली. आफताब आणि श्रध्दाच्या नात्याला त्यांच्या घरच्यांचा विरोध असल्याने या दोघांनी दिल्लीत जाऊन एकत्र राहणं पसंत केलं. हे दोघेही दिल्लीत लिव्ह इन रिलेशनमध्ये एकत्र राहत होते. पुढच्या काही दिवसातच श्रद्धाने अफताबला लग्नाचा तगादा लावल्याने त्याने श्रद्धाची हत्या केली. आणि तीचे 35 तुकडे केले. इतकेच नाही तर त्याने श्रद्धाचे तुकडे तब्बल १८ दिवस फ्रीजमध्ये ठेवले. या घटनेने पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत लिव्हइन बाबत नेमका आपला कायदा काय सांगतो? आणि त्यासाठी काय तरतुदी आहेत.

लिव्हइन रिलेशनशिप योग्य की अयोग्य

पुण्यातील फॅमिली कोर्टाच्या अध्यक्षा वैशाली चांदणे म्हणाल्या की, लिव्ह इन रिलेशनशीप राहत असताना जी प्रामुख्याने जी कारणे समोर येत आहे. त्याबाबत फॅमिली कोर्टाच्या अध्यक्षा वैशाली चांदणे म्हणाल्या की यात दोघेही जर कमवते असले तर त्यांच्यात अधिकाराची भावना निर्माण होते. तसेच पूर्वी जो प्रेम आणि संवाद होत होता तो एका छता खाली रहात असल्यामुळे संवाद ऐवजी विसंवाद वाढत चालली आहे.तसेच लिव्ह इन रिलेशनशीप दोघेही पैसे कमवत असल्याने कोणीही कोणाचं ऐकत नाहीये.तसेच दोघेही शिक्षित असल्याने सोशल मीडियाचा जास्त प्रभाव असल्याने दोघांमध्ये भांडणे सुरू होतात.तसेच घरातील लोकांचे हस्तक्षेप वाढल्याने सध्या मोठ्या प्रमाणात वाद विवाद वाढले आहे असे देखील यावेळी चांदणे यांनी सांगितल.

लिव्हइन रिलेशनशिप

लिव्ह इन कायदेशीर की बेकायदेशीर? तज्ज्ञ विकिलांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक स्तरावर, लिव्हइन मान्यता असो वा नसो, भारतात याबाबत अनेक कायदेशीर अधिकार (Indian law criminalize live in relationships ) आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय कायदा लिव्ह-इन हा गुन्हा मानत नाही. एखादं अविवाहित असलेलं जोडपं तरुण तरुणी किंवा कोणतेही दोन लोक परस्पर संमतीने एकत्र राहू शकतात. भारतीय कायद्यात ते पूर्णपणे कायदेशीर ( Live in relationship legal in India ) आहे. भारतीय कायदा याला बेकायदेशीर मानत नाही.

ठोस कायदा नाही. मात्र - जरी आतापर्यंत भारतीय संसदेने किंवा कोणत्याही राज्य विधानमंडळाने लिव्ह-इन संदर्भात कोणताही ठोस कोडिफिकेशन कायदा केला नसला तरी, घरगुती हिंसाचार कायदा 2005 च्या कलम 2(f) अंतर्गत लिव्ह-इनची व्याख्या दिली गेली आहे. कारण घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, भारतीय कायदा लिव्ह-इनमध्ये एकत्र राहणाऱ्या लोकांना संरक्षण देतो. कोणत्याही दोन व्यक्तींना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल तर कायदा त्यांना संरक्षण देतो. मात्र, त्या संदर्भात न्यायालयाने काही नियम आणि अटी देखील घातलेल्या आहेत.

काय आहेत नियम अटी? 1)- दोन्ही पक्षांच्या वास्तव्याचा वाजवी कालावधी आवश्यक आहे. ते कधीही एकत्र असू शकत नाहीत किंवा वेगळे होऊ शकत नाहीत. यासाठी दोन्ही पक्षांनी योग्य कालावधी पूर्ण केला तरच तो लिव्ह इन मानला जाईल. लिव्ह इनसाठी, हा कालावधी 1 महिना, 2 महिने देखील असू शकतो परंतु यासाठी कोणतीही काळ वेळ मर्यादा नाही.
२) दोन्ही पक्षांनी पती-पत्नीप्रमाणे एकाच घरात एकत्र राहणे आवश्यक आहे. म्हणजेच दोघांनी एक घर वापरावे आणि एकाच छताखाली असावे.
३) - फक्त घरगुती वस्तू वापरा.
4) घरातील कामात मदत करा.
५) - लिव्ह-इनमध्ये राहणारे जोडपे त्यांच्या मुलाला त्यांच्यासोबत ठेवू शकतात.
६) लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याची माहिती प्रत्येकाला देण्यात यावी. स्पष्टपणे सांगायचे तर, गुप्त संबंध नसावेत. किंवा इतर कोणाकडूनही गुप्तपणे करू नये.
7) दोन्ही पक्ष प्रौढ असावेत.
8)- दोन्ही पक्षांनी स्वतःहून एकत्र राहण्याचा निर्णय असावा
९)- एक महत्त्वाची अट म्हणजे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यासोबत त्यांचा कोणताही पूर्व जोडीदार नसावा. तसेच त्यांची पूर्व पत्नी किंवा पती उपस्थित नसावा.

मुंबईत किती प्रकरणं? पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांचं वर्गीकरण हे कौटुंबिक हिंसाचारामध्येच केले जाते लिविंग साठी वेगळा कायदा नसल्याने त्याची वेगळ्या आकडेवारी काढली जात नाही किंवा त्याचं वेगळं वर्गीकरण केले जात नाही त्यामुळे अशा घटना नेमक्या किती घडल्यात याचा रेकॉर्ड राहत नाही.

कायदेशीर बाबी काय सांगतात? याबाबत बोलताना कायदे तज्ञ व मुंबई हायकोर्टाचे वकील नितीन सातपुते सांगतात की, "लिव्ह इन रिलेशनशिप हा एक असा विषय आहे जिथे एक सज्ञान मुलगा, मुलगी एकमेकांच्या संमतीने एकत्र राहून आपले शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतात. स्त्री-पुरुष दोघेही सज्ञान असल्याने भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार दोघांनाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणासोबत राहायचं तिथे काय करायचं याचा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. घटनेनेच त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असल्याने त्यांच्यावर कोणतीही बंधने टाकू शकत नाही कोणतेही कारवाई करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय देखील यामध्ये यापूर्वी असे निकाल दिलेले आहेत. अशा लिव्ह इन रिलेशन मधून जेव्हा दिल्ली सारख्या घटना होतात तेव्हा त्यावर कारवाई काय? अशा जेव्हा बाबी समोर येतात तर अशा घटनांमध्ये कोणत्याही कायदेशीर तरतुदी नाहीत."

लिव्ह इन रिलेशन ऍक्ट बनला पाहिजे - पुढे बोलताना ऍड. सातपुते सांगतात की, "हे जोडपे जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांचे एक सायकॉलॉजिकल चाचणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखादा लिव्ह इन रिलेशन ऍक्ट बनला पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने पावला उचलणे गरजेचे आहे. किंवा न्यायालयाने असा कायदा बनवण्यासाठी निर्देश देणे गरजेचे आहे. ही जी जोडपी आहेत ती ज्या ठिकाणी राहतात याची नोंद तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला होणे गरजेचे आहे. दर महिन्याला किंवा सहा महिन्याने याच रिपोर्टिंग संबंधित पोलीस स्टेशनला होणे गरजेचे आहे. यात या जोडप्यातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघेही सुरक्षित आहेत का? याचा आढावा घेतला गेला पाहिजे. याच्यातून काय होईल मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांवरही वचक राहील आणि लक्ष राहील. आता आमच्या एका महिला साथीदाराच्या मदतीने यासंदर्भात आम्ही एक याचिका दाखल करणार आहोत आणि या लिविंग बाबत काही कायदे बनवता येतात का याच्यावर कायद्याचं वचक कसे ठेवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत." अशी प्रतिक्रिया एडवोकेट नितीन सातपुते यांनी दिली आहे.

समुपदेशक काय सांगतात? - या लिविन प्रकरणाबाबत समुपदेशक तज्ञांचे देखील आम्ही म्हणणं घेतले. समुपदेशक डॉक्टर कमलेश सूर्यवंशी यांच्यामते लिव्हइनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी आधी आपलं नातं समजून घेतलं पाहिजे. त्या दोघांनी एकमेकांचा तितकाच आदर केला पाहिजे. लिव्हइनचा अर्थ याच्यामध्ये एकत्र राहणारे जोडपं हे आधी एकमेकांना जाणून घेतो आणि त्यानंतर ठरवतं की हे नातं पुढे सुरू ठेवायचं की नाही. आपला इगो, आपला मान अपमान बाजूला ठेवून एकमेकांना यामध्ये समजून घ्यायचे असतं. आपल्याकडे एक पुरुषी मानसिकता नावाचा प्रकार आहे. बऱ्याचदा होतं काय जोडीदारांमध्ये ती चांगली सुशिक्षित असते, तिला पगार देखील त्याच्यापेक्षा जास्त असतो. आणि जेव्हा समोरची व्यक्ती काही काम सांगते तेव्हा त्याचा इगो दुखावतो. इथेच त्यांच्या भांडणाची ठिणगी पडते. हे भांडण हळूहळू वाढत जात मग ही जोडपी विभक्त होतात. लग्न झालेले घटस्फोट घेतात. अशातून मग कधी कधी अशा घटना घडतात." अशी प्रतिक्रिया मानसोपचार तज्ञ डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.