ETV Bharat / state

Tata Air Bus project : टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिक मध्ये करा, भुजबळांचे रतन टाटांना पत्र

author img

By

Published : Oct 28, 2022, 3:37 PM IST

Updated : Oct 28, 2022, 4:55 PM IST

टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रात आणि विशेषतः नाशिकमध्ये व्हावा यासाठी छगन भुजबळ यांनी लिहिले होते पत्र. छगन भुजबळ यांनी रतन टाटा यांच्याशी केला होता पत्रव्यवहार. तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू. नाशिकमध्ये प्रकल्प सुरू करावा, असे छगन भुजबळ यांनी केले होते आवाहन.

टाटा एअरबस प्रकल्पासाठी छगन भुजबळ यांनी लिहिले होते रतन टाटांना पत्र
टाटा एअरबस प्रकल्पासाठी छगन भुजबळ यांनी लिहिले होते रतन टाटांना पत्र

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात ( tata airbus project in maharashtra )आणि विशेषतः नाशिक मध्ये व्हावा यासाठी छगन भुजबळ यांंनी थेट रतन टाटा यांनी पत्र ( Letter written by Chhagan Bhujbal to ratan tata ) लिहिले होते . टाटा समूहाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू त्यासाठी नाशिक मध्येच हा प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन भुजबळ यांच्यातर्फे रतन टाटा यांना करण्यात आले होते.

छगन भुजबळ यांनी लिहिले होते रतन टाटांना पत्र
छगन भुजबळ यांनी लिहिले होते रतन टाटांना पत्र

राज्यातील रोजगार जाणार - महाराष्ट्रातून टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने छगन भुजबळ यांनी दुःख देखील व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील तरुणांचे मोठ नुकसान होणार आहे. तरुणांच्या रोजगारासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते, असेही छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये - टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरला आहे. नवीन सरकार राज्य स्थापन होऊन तीन महिने उलटले आहेत. या तीन महिन्यांमध्ये तीन मोठे प्रकल्प गुजरात राज्यात गेले. या वरून विरोधक सरकारी पक्षावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हे प्रकल्प आणण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. कोणताही पत्र व्यवहार झाला नाही. मात्र आता प्रकल्प गेल्यावर केवळ राजकारण करण्याचं काम विरोधकांचे सुरू आहे, असा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे.

Last Updated : Oct 28, 2022, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.