ETV Bharat / state

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत नाही - वकील सीमा कुशवाह

author img

By

Published : Dec 9, 2022, 10:12 PM IST

श्रद्धा हत्या प्रकरणात ( Shraddha murder case ) न्यायालयात महिला वकील सीमा कुशवाह ( Lawyer Seema Kushwaha ) खटला लढवणार आहेत. त्या म्हणाल्या की, श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे जे प्रौढ आहेत, जे अल्पवयीन नाहीत त्यांना हवे तसे राहण्याचे, फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. तुळींज पोलिसांकडे पहिल्यांदा श्रद्धाने जेव्हा तक्रार अर्ज केला. त्यावेळी पोलिसांनी तपास करून तिच्या पालकांना संपर्क साधायला हवा होता.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात ( Shraddha Murder Case ) तुळींज पोलिसांनी दिरंगाई केल्याचा ठपका ठेऊन त्या पोलिसांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. तसेच आफताबचे आई-वडील आणि भाऊ यांचीही सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर या कटात आणखी कुणी सामील असेल तर त्यांचीही चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मी अपेक्षा करतो असे विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे सरकारने सरकारी वकील दिला असून आमची बाजू कोर्टात वकील सीमा कुशवाह ( Lawyer Seema Kushwaha ) मांडणार असल्याचे देखील सांगितले. वकील सीमा कुशवाह यांनी श्रद्धा वालकर हत्याकांड पालकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फाशीची शिक्षा झाली पाहिजे: वकील सीमा कुशवाह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे जे प्रौढ आहेत, जे अल्पवयीन नाहीत त्यांना हवे तसे राहण्याचे, फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. तुळींज पोलिसांकडे पहिल्यांदा श्रद्धाने जेव्हा तक्रार अर्ज केला. त्यावेळी पोलिसांनी तपास करून तिच्या पालकांना संपर्क साधायला हवा होता. आता संपूर्ण तपास होईपर्यंत थांबावे लागेल. आफताबने केलेल्या गुन्ह्याबद्दल जर त्यांना माहिती नव्हती तर त्यांनी घर का बदलले, असा सवाल देखील सीमा कुशवाह यांनी उपस्थित केला आहे.

वकिल सीमा कुशवाह प्रतिक्रिया व्यक्त करताना..

देशातील मोठे खटले लढवले: निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटकवून चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशमधील इटावा येथील वकील सीमा कुशवाह या हाथरस पीडित मुलीला न्याय देण्यासाठी स्वतंत्र खटला लढत आहेत. या दरम्यान, हाथरसच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी त्यांची झालेली चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. पत्रकारांनी त्यांना हाथरसला जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा खटला लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी सीमा यांनी कोणतीही फी घेतली नाहीॉ. त्या म्हणाल्या की, पीडितेच्या कुटूंबाची इच्छा आहे की, त्यांचा वकील म्हणून मी हा खटला लढावा.


कोण आहेत सीमा कुशवाह: सीमा समृद्धी सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि निर्भया ज्योती ट्रस्टच्या कायदेशीर सल्लागार आहेत. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर सीमा यांनी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 24 जानेवारी २०१४ रोजी सीमा निर्भया ज्योती ट्रस्टमध्ये रुजू झाली. सीमा कुशवाह मूळच्या उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी इटावाच्या बिधीपूर ब्लॉकमधील तहसील चक्रानगर येथील माहेवा, तहसील चक्रानगर या छोट्याशा गावात उघापूर या गावी झाला. त्यांचे वडील बालादीन कुशवाह हे बिधीपूर ग्रामपंचायतीचे गावप्रमुखही होते. वडिलांच्या मृत्यूनंतर, आर्थिक संकटाशी दोन हात करून सीमाने कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. आर्थिक अवस्था बिकट असताना त्यांना प्रौढ शिक्षण विभागात कंत्राटी नोकरी देखील मिळाली. त्यांनी कानपूर विद्यापीठातून 2005 मध्ये एलएलबी पूर्ण केले. २००६ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एमएही केले. सीमा यांना आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा होण्यापूर्वी त्यांनी यासाठी तयारी केली.


सीमा यांचे पती कोण? : सीमा यांचे पती राकेश हे मुंगेर, बिहार राज्यातील संग्रामपूर ब्लॉकमधील पौरिया गावातले आहेत. ते गणिताचे शिक्षक आहेत आणि दिल्लीतील आयआयटी तयारी संस्थेशी संबंधित आहेत. निर्भयाचा खटला लढताना तीसुद्धा बर्‍याच वेळा आजारी पडली असल्याचे सीमा सांगतात. पण त्यादरम्यान, पती राकेश सर्व वेळ माझ्यासोबत माझ्या पाठीशी उभा राहिले. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.