ETV Bharat / state

ST Corporation : राज्यातील 250 आगारांपैकी निम्मे बस आगारामध्ये वाहनतळ, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

author img

By

Published : Jan 4, 2023, 11:05 PM IST

राज्यातील 250 बस डेपोपैकी निम्म्या बस ( ST Corporation ) डेपोमध्ये पार्किंगसाठी जागा, मूलभूत सुविधांचा अभाव ( Lack of basic facilities at bus depots ) असल्याने महिला प्रवाशांचे, ( Plight of women passengers ) कर्मचाऱ्यांचे दररोज हाल होत आहेत.

ST Corporation
ST Corporation

मुंबई - एसटी महामंडळाला ( ST Corporation ) चांगले दिवस आणण्याचे एसटी महामंडळाने ठरवले आहे. उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत, आधार निर्माण करण्याबाबत निर्णय देखील त्यांनी घेतले. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप ( ST employees strike ) पाच महिने चालला .मात्र त्यातून कामगारांनी काय कमावले हा जसा संशोधनाचा विषय आहे. तसेच राज्यातील 250 बस आगारांपैकी निम्मेपेक्षा अधिक बस डेपो मूलभूत सोयी सुविधा पासून ( Lack of basic facilities at bus depots ) वंचित आहे जाणून घेऊया सविस्तरपणे.

मूलभूत सोयी सुविधांचा अभाव - राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या सुमारे 14 हजार गाड्या रोज धावतात. या लाल परी साध्या एसटी वातानुकूलित एसटी, जलद ,अतिजलद शिवनेरी असे अनेक प्रकार आहेत. या सर्व गाड्या मिळून एसटी महामंडळ आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी महामंडळाचे 90 हजार कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतरही शासनाने एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण केलेले नाही. मात्र उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक नवीन गोष्टी करण्याचा चंग एसटी महामंडळाने बांधला आहे. मात्र हजारो गाड्या घेण्याची कुवत असणाऱ्या महामंडळाने परिवहन विभागाने मूलभूत सोयी सुविधा असणे त्या नियमितपणे सुरू राहणे हे देखील करायला पाहिजे.

बस डेपो इमारतीची दयनीय अवस्था- नवीन बस खरेदी निर्णय होत असताना राज्यांमध्ये ठराविक मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर यासारखी शहर तेथील बस आगार हे सोडले तर, इतर ठिकाणच्या बस आगारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. बस डेपो इमारतीची दयनीय अवस्था झालेली आहे. हे आपल्याला तालुक्याच्या बस आगारामध्ये गेल्यावर स्पष्टपणे दिसत. केवळ लाल परीने जाणारे प्रवासीच नव्हे तर एसटी महामंडळाचे सर्व चालक व वाहक इतर कर्मचारी त्यांना देखील रोजच्या मूलभूत गरजा आहे. त्याकडे परिवहन मंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे. प्रसाधनगृह चांगले असणं तिथे 24 तास पाण्याचा पुरवठा असणं अशा अनेक मूलभूत सोयी सुविधा पासून बस आगार वंचित आहेत.

प्रसाधन गृह नसल्यामुळे अडचण - याचा परिणाम एसटी कर्मचारी, प्रवासी जनता यांच्या आरोग्यावर होतो विशेष करून महिला कर्मचारी महिला प्रवासी यांना तर प्रसाधन गृह नसल्यामुळे फारच अडचण सोसावी लागते. त्यामुळे एसटी महामंडळाने यावर युद्ध पातळीवर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. नाही म्हणायला काही ठिकाणी प्रसाधन गृह व्यवस्थित आहेत. तिथे पाणी असतं परंतु बहुतांशी बस आगारांमध्ये ही सुविधा ठीक नाही. वाहन तर ठीक नाही इमारत पडायला आलेली आहे. शेकडो बस आगारातील प्रसाधनगृह खाजगी संस्थांकडे चालवायला दिली आहेत. मात्र त्यांची अवस्था बिकट आहे.


यासंदर्भात ईटीवी वतीने प्रत्यक्ष काही बस आगारांमध्ये जाऊन तिथले दृश्य टिपले एसटी कर्मचारी याबाबत कोणतेही वक्तव्य करू शकले नाहीत. मात्र, जी वस्तूस्थिती दिसली त्यावरनं एसटीच्या आधाराची इमारत मोडकळी झालेली आहे. तिच्यामध्ये कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. तिला साधी डाकदोजी नाही वाहन तळ देखील खराब असल्याचं दिसून आलेला आहे.



पाण्याचा अभाव - या संदर्भात एसटी कर्मचारी काँग्रेस नेते श्रीरंग बर्गे यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की राज्यामध्ये अनेक आगरामध्ये एसटी कर्मचारी किंवा प्रवासी यांच्यासाठी प्रसाधनगृहाची सोय आहे. मात्र खाजगी संस्थांकडे त्याचे काम दिले गेलेले आहे. त्यामुळे बराचश्या ठिकाणी हे प्रसाधनगृह व्यवस्थित नाही. त्यामध्ये पाणी नसतं. याचा खास करून त्रास महिला चालक वाहक, महिला प्रवासांना होतो. त्यामुळे त्यांना रोज तो त्रास सहन करावा लागतो. ह्यावर महामंडळाने शासनाने लक्ष दिले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.